माढा, १९ मार्च २०२४ : लोकसभा निवडणूकीचे बिगूल वाजले असून सर्वच पक्षांच्या आणि मतदारसंघातील नेते मंडळींच्या गाठीभेटी आणि बैठकी होत आहेत. या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीची बैठक करमाळ्याचे आ. संजयमामा शिंदे यांच्या (नगोली) टेंभूर्णी येथील फार्म हाऊसवर पार पडली. यावेळी पत्रकार परीषदेमध्ये खा. रणजितसिंह निंबाळकर यांनी माढा मतदारसंघात भाजपा विरोधात तुल्यबळ उमेदवार नाही असे प्रतिपादन केले. तसेच विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नाराजीवर वरीष्ठ पातळीवर मन धरणी सुरू असून चर्चेअंती प्रश्न मार्गी लागेल अशी शाश्वती देखील दिली.
यावेळी आ. बबनराव शिंदे यांनी बोलताना म्हटले कि, माढा मतदारसंघात महायुतीची वज्रमूठ कायम राहणार असून महायुतीतील सर्वच नेते एकजूटीने काम करणार आहेत. यावेळी माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी गतवर्षीपेक्षा अधिकचे मठाधिक्य निंबाळकर यांना देण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत अशी ग्वाही दिली. तर माळशिरस तालुक्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून विकासकामांच्या पाठबळावर जनता भरगोस मतदान महायुतीच्या उमेदवारला देणार असल्याचे आ. राम सातपुते यांनी सांगितले.
यावेळी बबनराव शिंदे, जयकुमार गोरे, संजयमामा शिंदे, शहाजी पाटील, आ. राम सातपुते माढा, करमाळा, माळशिरस, माण खटाव व सांगोला या पाच तालुक्यातील आमदारांची उपस्थिती होती. तसेच कल्याणराव काळे, रणजितसिंह शिंदे, दिपक साळुंके, दिग्विजय बागल, शंभूराजे जगताप, भारत शिंदे आदींसह महायुतीचे पदाधाकारी देखील उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रदीप पाटील