दूरध्वनी सेवांच्या किमतींमध्ये होणार दर वाढ

नवी दिल्ली, दि. ६ जुलै २०२०: येत्या काळामध्ये नेटवर्क विषयी सेवांमध्ये दरवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नेटवर्क विषयी सुविधा म्हणजेच यामध्ये फोन कॉल्स, डाटा व इंटरनेटविषयी सुविधांमध्ये दरवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कारण येत्या दीड वर्षांमध्ये या सर्व सेवांमध्ये दरवाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे.

आघाडीची संस्था असलेल्या कन्सल्टन्सी ई वाय इंडियाने ने म्हटले आहे की ‘दूरसंचार क्षेत्रातील सध्याची संरचना लाभदायक नाही. यामध्ये ऑपरेटरला योग्य परतावा मिळत नाही. त्यामुळे टेलिकॉम सेक्टरमधील शुल्कवाढ ‘अपरिहार्य’ आहे. परिणामी येत्या १२ ते १८ महिन्यात दोन वेळेस दरवाढ होऊ शकते’.

आपल्या निवेदनात पुढे त्यांनी म्हटले आहे की, “सध्याच्या परिस्थितीत तातडीने दरवाढ होणार नाही, पण पुढील १२ ते १८ महिन्यात दोन टप्प्यात ही वाढ केली जाऊ शकते. त्यातील पहिली दरवाढ येत्या सहा महिन्यांमध्येच होण्याची शक्यता आहे”, असे EY चे प्रशांत सिंघल म्हणाले. “ही वाढ होईलच असे मी म्हणत नाही, पण बाजारात टिकून राहण्यासाठी १२ ते १८ महिन्यात दर वाढवणं टेलिकॉम कंपन्यांसाठी ‘अपरिहार्य’ आहे. ही दरवाढ नियामक हस्तक्षेपाने होते की टेलिकॉम उद्योग स्वत: ही दरवाढ करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल”.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा