गोल पोस्ट राष्ट्रीय गुगल पे वापरावर भारतातील वापरकर्त्यांना कोणतेही शुल्क नसणार, गुगलचे स्पष्टीकरण

गुगल पे वापरावर भारतातील वापरकर्त्यांना कोणतेही शुल्क नसणार, गुगलचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली, २७ नोव्हेंबर २०२०: भारतात ‘गुगल पे’ वापरकर्त्यांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. गुगल इंडियाने बुधवारी स्पष्ट केले की इन्स्टंट मनी ट्रान्सफरवर फी लागू करण्याची घोषणा केवळ अमेरिकन बाजारासाठी असून त्याचा भारतातील अॅप्सवर कोणताही परिणाम होणार नाही.

गुगलने केलेल्या या घोषणेनंतर आता हे स्पष्ट झाले आहे की भारतात ‘गुगल पे’ कोणत्याही पैशाच्या व्यवहारावर शुल्क आकारणार नाही. भारतातील ‘गूगल पे’ शुल्काबाबत सध्या सुरू असलेल्या बातम्यांना नकार देत गुगलने म्हटले आहे की, लावण्यात आलेले हे शुल्क फक्त अमेरिकेसाठी आहे, हे शुल्क ‘गुगल पे’ किंवा गुगल पे फॉर बिझिनेस अ‍ॅपवर लागू होणार नाही.

असे काही अहवाल आले होते की जानेवारी २०२१ पासून, गुगल त्यांच्या पीयर-टू-पीयर पेमेंट सर्विस त्यांच्या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म गुगल वरून बंद करणार आहे. या सेवेच्या बदल्यात कंपनी त्वरित मनी ट्रान्सफर पेमेंट सिस्टम जोडेल, परंतु यासाठी वापरकर्त्यांना शुल्क भरावे लागेल.

केवळ अमेरिकेत आकारले जातील शुल्क

आता गुगल इंडियाने हे शुल्क केवळ अमेरिकेतच आकारले जाईल, असे स्पष्ट केले आहे. गुगलने एका सपोर्ट पेजवर स्पष्टीकरण दिले की मूळ गुगल पे अ‍ॅप जानेवारीत अमेरिकेत काम करणे थांबवेल. म्हणजेच त्याचा भारतात परिणाम होणार नाही आणि भारतात गुगल पे वापरणाऱ्या ग्राहकांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

कंपनीने आपल्या यूएस वापरकर्त्यांना सांगितले आहे की ते २०२१ मध्ये पैसे पाठविण्यासाठी किंवा त्यातून पैसे स्वीकारण्यासाठी pay.google.com वापरण्यात सक्षम होणार नाहीत. म्हणून, पैसे पाठविण्यासाठी किंवा स्वीकारण्यासाठी नवीन गुगल पे अ‍ॅप वापरले जावे. गूगल पे यूएस मधील वापरकर्त्यांसाठी त्वरित पैसे हस्तांतरणास शुल्क देखिला आकारले जाईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version