नवी दिल्ली, २१ ऑगस्ट २०२०: मे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत मोहीम सुरू केली. त्याअंतर्गत देशातील विविध क्षेत्रांना कर्ज देऊन स्वावलंबी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
त्याचबरोबर काही क्षेत्रांमध्ये खासगीकरणाचा विस्तारही केला जात आहे. यापैकी एक क्षेत्र विमानचालन (एविएशन) आहे. आत्मनिर्भर मोहिमेचा एक भाग म्हणून सरकारने सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलच्या माध्यमातून ५० वर्षांच्या कालावधीसाठी जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम विमानतळ भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे.
हे विमानतळ ५० वर्षासाठी मेसर्स अदानी एन्टरप्राइजेज लिमिटेडच्या ताब्यात गेली आहेत. वास्तविक, लिलावाच्या माध्यमातून यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या . अदानी समूहाने सर्वाधिक बोली लावली आहे.
याचा अर्थ काय
पीपीई मॉडेलचा अर्थ संपूर्ण खासगीकरण नाही. सरकारच्या अखत्यारीत भारतीय विमानतळ प्राधिकरणातही सहभागी होणार आहे. सध्या विमानतळ पीपीई मॉडेल अंतर्गत ५० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर आहे. यानंतर हे तीन विमानतळ पुन्हा विमानतळ प्राधिकरणाकडे परत केले जातील.
न्यूज अनकट प्रतिनिधी