ही आहेत जगातील ६ ठिकाणं जिथं सूर्यास्त होत नाही

पुणे, ९ सप्टेंबर २०२१: दिवस संपल्यानंतर सूर्यास्त होणारच आहे आपल्याला ठाऊक आहे. परंतु कधीकधी आपण विचार करतो की सूर्यास्त नसल्यास किती चांगलं होईल. पण, तसं होणं अशक्य आहे. जगभरात अशी अनेक विचित्र ठिकाणं आहेत जिथं वर्षातील अनेक दिवस सूर्यास्त होत नाही. यावर विश्वास ठेवणं थोडं कठीण आहे, पण हे खरं आहे की जगात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथं रात्र होत नाही. चला आज या ठिकाणांची ओळख करून देऊया ….

नॉर्वे- नॉर्वे आर्कटिक सर्कलमध्ये येतो. या देशाला लँड ऑफ मिड नाईट असंही म्हणतात. येथे मे ते जुलै दरम्यान सुमारे ७६ दिवस सूर्य मावळत नाही. नॉर्वेच्या स्वालबार्डमध्ये १० एप्रिल ते २३ ऑगस्टपर्यंत सूर्य सतत चमकतो. तिथं जाऊन तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता.

नुनावत, कॅनडा- नुनावत हे कॅनडामधील एक छोटं शहर आहे. कॅनडाच्या या वायव्य भागात जवळपास दोन महिने सूर्य सतत चमकतो. तर हिवाळ्यात या ठिकाणी सलग ३० दिवस पूर्णपणे रात्र असते.

आइसलँड – ग्रेट ब्रिटन नंतर हे युरोपमधील सर्वात मोठं बेट आहे. येथे जून महिन्यात सूर्यास्त होत नाही. येथे तुम्ही मध्यरात्रीसुद्धा सूर्यप्रकाशाचा आनंद घेऊ शकता.

बॅरो, अलास्का – मे महिन्याच्या उत्तरार्ध ते जुलैच्या अखेरीस येथे सूर्य मावळत नाही. परंतु नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून, पुढील ३० दिवसांसाठी येथे रात्र असते. याला पोलर नाईट असंही म्हणतात. हे ठिकाण बर्फाच्छादित पर्वत आणि सुंदर हिमनद्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. आपण येथे भेट देऊन त्याच्या सौंदर्याचा आनंद घेऊ शकता.

फिनलँड – हजारो तलाव आणि बेटांनी सजलेला हा देश अतिशय सुंदर आहे. उन्हाळ्याच्या हंगामात, सूर्य येथे सुमारे ७३ दिवस आपला प्रकाश पसरवतो. येथे तुम्हाला नॉर्दर्न लाइट्सचा आनंद घेण्याची संधी मिळते. याशिवाय, तुम्ही फिनलँडमध्ये स्कीइंगला जाऊ शकता तसंच काचेच्या इग्लूमध्ये राहण्याचा अनुभव घेऊ शकता.

स्वीडन- येथे मे ते ऑगस्ट मध्यरात्री सूर्य मावळतो आणि नंतर पहाटे साडेचार वाजता बाहेर पडतो. येथे सूर्य ६ महिने सतत आपला प्रकाश पसरवतो. म्हणून लोक येथे अनेक दिवस गोल्फिंग, मासेमारी, ट्रेकिंग ट्रेल्स आणि अनेक साहसी उपक्रम करू शकतात.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा