क्रिकेट विश्वातील ‘या’ आहेत सर्वात दुखद घटना, १७ खेळाडूंनी गमावला आपला जीव

पुणे, ८ डिसेंबर २०२०: खेळांचा राजा क्रिकेट! फुटबॉलनंतरचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लोकप्रिय खेळ क्रिकेट जगभर लोकप्रिय असलेला हा खेळ. आजही जगभरात किती नव तरूण उद्या च्या भविष्यातील आधुनिक क्रिकेट साठी तयार होत आहे. पण, याच लोकप्रिय खेळाने इतिहासात काही काळ्या दिवसांची देखील नोंद केली आहे. आज त्या बद्दलच आपण जाणून घेणार आहोत.

इंग्लंड क्रिकेट चा जन्मदाता म्हणून ओळखल्या जाणार्या देशाचेच क्रिकेट मैदानात खेळत असताना ११ खेळाडूंचा मृत्यू झाला आहे. तर अन्य देशातील ६ खेळाडूंचा ही यामधे समावेश आहे. ज्यामधे ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, साउथ आफ्रिका आणि भारताच्या ही खेळाडूंचा समावेश आहे.

या घटना १६२४ पासून ते २०१५ पर्यंतच्या काळातील आहेत

१.जेसपर विनाल : 

इंग्लंड चे जेसपर विनाल मैदानावर जीव गमावणारे जगातील पहीले क्रिकेटर होते. २८ ऑगस्ट १६२४ रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यात डोक्यावर बॅट लागल्याने त्यांचे निधन झाले. हा सामना ससेक्स मधे खेळण्यात आला होता.

२, फ्रेडरिक, प्रिंस आफ वेल्स : 

१७२७ पासून ब्रिटिश सिंहासन चे उत्तराधिकारी राहीलेले फ्रेडरिक किंग जॉर्ज II कैरोलिन यांचा मोठा चिरंजीव ते होते. त्यांना क्रिकेट मधे रूची आसल्याचं मानलं जाते. २० मार्च १७५१ मधे लंडनला खेळाणार्या मॅच मधे बाॅल लागल्याने त्यांचा जीव गेला होता.

३.जॉर्ज समर्स :

 नॉटिंघम मधे २९ जून १८७० ला खेळल्या गेलेल्या सामन्यात डोक्यावर चेंडू लागल्याने इंग्लैंड चे जॉर्ज समर्स यांचा मृत्यू झाला होता.

४.एचपी लाइटन : 

१८७२ मधे खेळण्यात आलेल्या या सामन्यात एचपी लाइटन च्या बाॅलवर बॅट्समने इतका जोरात शाॅट लगावला की तो परत बाॅलर ला जाऊन अर्थात एचपी लाइटनला लागला ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ही मॅच डर्बीशायर मधे खेळण्यात आली होती.

५.क्लाउड विल्सन:

 सरे मधे २९ जून १८८१ ला ही मॅच खेळण्यात आली होती. ज्यामधे इंग्लंड चे क्लाउड विल्सन ला सनस्ट्रोक मुळं आपला जीव गमवावा लागला.

६.फ्रेडरिक रैंडन: 

इंग्लंडच्या या खेळाडूच्या डोक्याला वर्ष १८८१ साली लाॅडर्स मधे खेळण्यात आलेल्या मॅच मधे बाॅल लागला. या जख्मेतून फ्रेडरिक कधीच स्वताला सावरू शकला नाही आणि शेवटी १८८३ मधे त्यांना आपला जीव गमवावा लागला.

७.आर्थर एरलम : 

इंग्लंड च्या या खेळाडूचे वय अवघे १७ होते. या वयात १९२१ साली खेळण्यात आलेल्या सामन्यात बाॅलर आर्थर च्या बाॅलवर बॅट्समने समोर शॉट लावला आणि तो बाॅल आर्थर च्या डोक्याला जाऊन लागला ज्या मुळे एका यंग खेळाडूचा मृत्यू झाला.

८.एंडी डुकट : 

२३ जुलै १९४२ ला लंडन मधे सामना खेळला जात होता, ज्यामधे इंग्लंड चे एंडी डुकट यांना ह्रदय विकाराचा तीव्र झटका आला आणि त्याचे निधन झाले.

९.अब्दुल अजीज :

 इंग्लंड च्या खेळाडूं व्यतिरिक्त मैदानावर अन्य देशाच्या खेळाडूंचे जीव गेले आहेत. पाकिस्तान चे अब्दुल अजीज १७ जानेवारी १९५९ ला कराची मधे मॅच खेळत होते. तेव्हा एक बाॅल जोरात येऊन त्यांच्या ह्रदयाला लागला ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

१०. माइकल एंसवर्थ: 

२८ ऑगस्ट १९७८ ला लंडन मधे झालेल्या या सामन्या दरम्यान एक आगळा वेगळा किस्सा घडला ज्या मुळे अचानक च इंग्लंडच्या माइकल एंसवर्थ चा मृत्यू झाला.

११.विल्फ स्लैक : 

गांबिया मधे १५ जानेवारी १९८९ साली खेळण्यात आलेल्या सामन्यात विल्फ स्लैक बॅटींग करत होते आणि ते अचानक खाली पडले व त्यांचे निधन झाले.

१२. लैन फॉली : 

३० ऑगस्ट १९९३ ला एक क्रिकेट सामना खेळला जात होता. जिथे इंग्लंड चे लैन फॉली यांच्या डोळ्यावर बाॅल लागला आणि हाॅस्पिटल मधे उपचारा दरम्यान त्यांना ह्रदय विकाराचा तीव्र झटका आल्यामुळं त्यांचा मृत्यू झाला.

१३.रमन लांबा : 

(भारतीय खेळाडू) २० फेब्रुवारी १९९८ ला ढाका मधे मॅच खेळत असताना फील्डिंग करताना रमनला डोक्याला बाॅल लागला आणि मैदानातच त्याचा मृत्यू झाला.

१४.वसीम राजा : 

पाकिस्तान चा खेळाडू वसीम राजा ला पिचवरच ह्रदय विकाराचा झटका आला होता, ज्यानंतर त्यांना वाचवण्यात अपयश आले. ही मॅच २३ ऑगस्ट २००६ ला इंग्लंड मधे खेळण्यात आली होती.

१५. डैरन रैंडल: 

साउथ अफ्रीका चे डैरन रैंडल २७ ऑक्टोंबर २०१३ ला ईस्टर्न केप मधे क्रिकेट सामना खेळत होते. याच वेळी त्यांच्या डोक्याला बाॅल लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.

१६. फिलिप ह्यूज :

 ऑस्ट्रेलिया बॅट्समन फिलिप ह्यूज ला बाउंसर लागल्याने झालेल्या मृत्यू ने संपूर्ण जगाला हादरवले होते. २७ नोव्हेंबर २०१४ च्या सामन्यात बॅटींग करत आसताना डोक्याला बाउंसर लागल्याने ह्यूज ला जीव गमवावा लागला.

१७. रेमंड वान शूर :

 नामीबिया मधे २० नोव्हेंबर २०१५ ला खेळण्यात आलेल्या सामन्यात दक्षिण अफ्रीकीच्या खेळाडू रेमंड वान शूर चा स्ट्रोक मुळे मृत्यू झाला.

क्रिकेटच्या मैदानावर दर्शक रोमहर्षक मॅच बघण्यासाठी येत असतात, मात्र त्यांना कधी कधी अनेक वेळा क्रिकेट इतिहासातील काळ्या दिवसाचे साक्षीदार व्हावे लागते, जे वाईट स्वप्नापेक्षा कमी नसते आणि त्यातही दुर्दैवी म्हणजे मैदानावरच खेळाडूबरोबर त्यांनी कल्पना ही न केलेल्या दुःखद घटना घडणे आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा