अशी असणार ८ आफ्रिकन चित्त्यांची नावं

नवी दिल्ली, १९ सप्टेंबर २०२२: आफ्रिकन देश नामिबियातून आणलेल्या ८ चित्त्यांची नावं मध्य प्रदेशातील श्योपूर येथील कुनो राष्ट्रीय उद्यानात समोर आली आहेत. ओबान, फ्रेडी, सवाना, आशा, सिबली, सायसा आणि साशा अशी आठ चित्त्यांची नावं आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मादी बिबट्याला ‘आशा’ असं नाव दिलं आहे. तर, इतर चित्त्यांची नावं नामिबियामध्ये ठेवण्यात आली होती.

१७ सप्टेंबर रोजी या चित्त्यांना नामिबियातून कुनो नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आलं. खुद्द पीएम मोदींनीच गेट उघडून त्यांना सोडलं. पहिल्या दिवशी स्वतःला नवीन परिसरात पाहून चित्ते थोडे घाबरले होते. पण त्यांचं वागणं सामान्य आणि सकारात्मक दिसलं.

चित्त्यांचे सर्व महत्त्वाचे मापदंड सामान्य आहेत, सर्व ८ चित्ते आरामात झोपलेले आहेत आणि मुक्तपणे फिरत आहेत. त्यांच्यासाठी बनवलेल्या खास आवारात चित्त्यांना मांस खायला दिलं जात आहे. सध्या उद्यान व्यवस्थापन चित्त्यांच्या वागण्या-वावरण्यावर पूर्णपणे समाधानी आहे. कुनो व्यवस्थापन सांगतात की, आमची नजर सतत चित्त्यांवर असते. सध्या सर्व काही सामान्य आहे.

७४ वर्षांनंतर पुन्हा एकदा भारताच्या मातीवर चित्ता दिसला आहे. १९५२ मध्ये देशातून चित्ता नामशेष झाल्याचं घोषित करण्यात आलं. मात्र आता पुन्हा देशाच्या मातीवर चित्ते धावताना दिसत आहेत. या चित्तांचं रक्षण करण्यासाठी ९० गावांतील ४५० हून अधिक लोकांना ‘चित्ता मित्र’ बनवण्यात आलंय. चित्त्यांना शिकारीपासून वाचवणे हे त्यांचं काम असंल.

सध्या या चित्त्यांना १२ किमी परिसरात तयार केलेल्या कुंपणात ठेवण्यात आलंय. जेव्हा सर्व मादी आणि नर चित्ता एकत्र होतील, तेव्हा त्यांना बंदिवासातून बाहेर सोडलं जाईल. चित्त्यांना कळपात राहायला आवडतं.

चित्त्यांसाठी जागा

कुनो नॅशनल पार्कचा बफर झोन १२३५ चौरस किलोमीटर आहे. उद्यानाच्या मध्यभागी कुनो नदी वाहते. कमी उतार असलेल्या टेकड्या आहेत. पन्ना व्याघ्र प्रकल्प आणि शिवपुरीची जंगले दक्षिण-पूर्व भागात आहेत. या भागाजवळून चंबळ नदी वाहते. म्हणजेच चित्त्यांचं एकूण क्षेत्रफळ ६८०० चौरस किलोमीटर असंल.

भरपूर अन्न

कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांना भरपूर अन्न आहे. उदाहरणार्थ, चितळ, सांबर, नीलगाय, रानडुक्कर, चिंकारा, चौसिंगा, काळवीट, राखाडी लंगूर, लाल तोंडी माकड, रॉयल, अस्वल, कोल्हा, हायना, राखाडी लांडगा, सोनेरी कोल्हा, मांजर, मुंगूस असे अनेक प्राणी आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा