नवी दिल्ली, दि. १७ जून २०२० : कित्येक दशकांनंतर भारत आणि चीनदरम्यान सीमेवरची परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. सोमवारी लडाखजवळील गलवान व्हॅलीजवळ सोमवारी झालेल्या हिंसक चकमकीत भारताचे २० सैनिक शहीद झाले. यामध्ये भारतीय सैन्याच्या कमांडिंग ऑफिसरचा समावेश होता. याची पुष्टी लष्कराने मंगळवारी संध्याकाळी केली आणि आता सर्व शहीदांची नावे बुधवारी जाहीर करण्यात आली आहेत.
या सैनिकांच्या मृत्यूमुळे देशात संताप व्यक्त केला जात आहे आणि प्रत्येकजण चीनकडून सूड घेण्याविषयी बोलत आहे. या सैनिकांच्या कुटुंबीयांनी असे म्हटले आहे की, त्यांना गर्व आहे की त्यांच्या कुटुंबातील कोणीतरी एका व्यक्तीने देशासाठी आपले प्राण अर्पण केले आहेत.
ही आहेत शहिदांची नावे
१. कर्नल संतोष बाबू, हैदराबाद
२. ना. सु. नुदुराम सोरेन, मयूरभंज
३. ना. सु. मनदीप सिंग, पटियाला
४. ना. सु. सतनाम सिंह, गुरदासपूर
५. हवालदार के. पलानी, मदुराई
६. हवालदार सुनील कुमार, पटना
७. हवालदार बिपुल रॉय, मेरठ
८. ना. दिपक कुमार, रीवा
९. सैनिक राजेश औरंग, बीरभूम
१०. सैनिक कुंदन कुमार, साहिबगंज
११. सैनिक गणेश राम, कांकेर
१२. सैनिक चंद्रकांत प्रधान, कंधमाल
१३. सैनिक अंकुश, हमीरपूर
१४. सैनिक गुरबिंदर, संगरूर
१५. सैनिक गुरतेज सिंग, मानसा
१६. सैनिक चंदन कुमार, भोजपूर
१७. सैनिक कुंदन कुमार, सहरसा
१८. सैनिक अमन कुमार, समस्तीपूर
१९. सैनिक जयकिशोर सिंह, वैशाली
२०. सैनिक गणेश हंसदा, पूर्व सिंहभूमि
शहीदांच्या यादीमध्ये देशाच्या विविध भागातील सैनिकांचा समावेश आहे. काही हैदराबादचे असून काही पंजाबचे आहेत, याशिवाय उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमधील अनेक सैनिकांची नावेही यात समाविष्ट आहेत. वर फोटो मध्ये दिलेल्या यादीमध्ये तुम्ही सर्व हुतात्म्यांच्या शहरांची नावे देखील पाहू शकता.
आपल्या सैनिकांवर देशाचा अभिमान आहे
या घटनेनंतर देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही सर्व सैनिकांना नमन केले आहे. बुधवारी राजनाथ सिंह यांनी ट्वीट करून लिहिले की, “… गलवान खोऱ्यात सैनिक गमावणे वेदनादायक आहे. आमच्या सैनिकांनी आपले कर्तव्य बजावून देशासाठी प्राण दिले. त्यांचा त्याग देश कधीही विसरणार नाही”.
संरक्षणमंत्र्यांनी लिहिले की ते शहीद सैनिकांच्या कुटूंबियांबद्दल सांत्वन व्यक्त करतात, देश त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे. आम्हाला आमच्या देशातील सैनिकांचा अभिमान आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी