वॉशिंग्टन, ६ नोव्हेंबर २०२०: अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचं युद्ध आपल्या अंतिम टप्प्यात सुरू आहे. पण अमेरिकेचा पुढचा अध्यक्ष कोण होईल हे अद्याप निश्चित झालेले नाही. आतापर्यंतच्या निकालात डेमोक्रॅट्स पक्षाचे जो बिडेन आघाडीवर आहेत आणि बहुमताच्या जवळ आहेत. दुसरीकडं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही विजयाचा दावा केला आहे आणि काही ठिकाणी मतमोजणीत घोटाळ्याचा आरोप केला आहे. परंतु हे युद्ध आता मुख्यतः चार राज्यांत येऊन थांबलं आहे, ही राज्येच ठरवतील की कोण अध्यक्ष होईल.
अमेरिकेच्या कोणत्या राज्यांमध्ये संघर्ष सुरू आहे?
पेनसिल्व्हेनिया:
या राज्यातील एकूण इलेक्टोरल मतं २० आहे. सुरुवातीला, डोनाल्ड ट्रम्प येथे नेतृत्व करीत होते, परंतु मेल इन वोट उघडताच जो बिडेन आघाडीवर आले. न्यूयॉर्क टाइम्सच्या मते, येथे ९४ टक्के मतमोजणी झाली आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांना ४९.७% तर जो बिडेन यांना ४९% मतं मिळाली आहेत.
जॉर्जिया:
या राज्यात एकूण १६ इलेक्टोरल मतं आहेत. इथं चुरशीचा सामना सुरू असून डोनाल्ड ट्रम्प अवघ्या दोन हजार मतांनी पुढं आहेत. आतापर्यंत इथं ९८ टक्के मतमोजणी झाली आहे, तर डोनाल्ड ट्रम्प यांना ४९.४% मतं मिळाली आहेत. आता मेल इन वोट मधील आकडेवारी हळूहळू समोर येत आहे त्यानुसार इथं ही चित्र बदलताना दिसंल.
उत्तर कॅरोलिना:
या राज्यात एकूण १५ इलेक्टोरल मतं आहेत. आतापर्यंत ९५ टक्के मतं मोजली गेली आहेत. आतापर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांना सुमारे ५० टक्के आणि जो बिडेन यांना ४८ टक्के मतं मिळाले आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते, येथे १२ नोव्हेंबरपर्यंत मेल-इन वोट मिळतील, म्हणजेच चित्र स्पष्ट होईल.
एरिजोना:
या राज्यात एकूण ११ इलेक्टोरल मतं आहेत, इथं केवळ ९० टक्के मतमोजणी झाली आहे. या राज्यात जो बिडेन ५० टक्के तर डोनाल्ड ट्रम्प यांना ३८.५ टक्के मतं मिळाली आहेत. या राज्यात आणखीन सुमारे तीन लाख मतं मोजणं बाकी आहे.
ही प्रामुख्यानं अशी चार राज्ये आहेत जिथं जास्त मते आहेत आणि यामुळं निवडणुकांच्या निकालावर फरक पडौल. याखेरीज नेवाडा येथेही विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे, तेथे ६ इलेक्टोरल मतं असून बिडेन येथे पुढं आहे. हे विशेष आहे कारण जर येथून बिडेन विजयी झाले तर त्यांना इलेक्टोरल मतांमध्ये बहुमत मिळंल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे