भारतातील या कंपन्या 2020 मधील टॉप 100 जागतिक शस्त्रास्त्र उत्पादक कंपन्यांमध्ये शामिल

पुणे, 8 डिसेंबर 2021: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) आणि इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरी या 2020 मध्ये जागतिक शस्त्रास्त्रे तयार करणाऱ्या आणि लष्करी सेवा कंपन्यांमध्ये टॉप 100 मध्ये आल्या आहेत, असे स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) ने सोमवारी सांगितले.  2019 च्या तुलनेत 2020 मध्ये त्यांची USD 6.5 बिलियनची एकत्रित शस्त्रे विक्री 1.7 टक्क्यांनी जास्त होती आणि एकूण 100 पैकी 1.2 टक्के हिस्सेदारी होती, असे एका निवेदनात नमूद केले आहे.
SIPRI च्या निवेदनात म्हटले आहे की, HAL, 42 व्या क्रमांकावर आणि BEL, 66 व्या क्रमांकावर आहे, अनुक्रमे 1.5 टक्के आणि 4.0 टक्क्यांनी त्यांची विक्री वाढली आहे. तसेच, indian Ordnance Factories च्या  (60 व्या क्रमांकावर) शस्त्रास्त्रांच्या विक्रीत किरकोळ (0.2 टक्के) वाढ झाली.
देशांतर्गत खरेदीमुळे भारतीय कंपन्यांना महामारीच्या नकारात्मक आर्थिक परिणामांपासून संरक्षण देण्यात मदत झाली आहे, असे SIPRI निवेदनात नमूद करण्यात आले आहे. देशांतर्गत शस्त्रांची एवढ्या मोठ्या प्रमाणावर खरेदी होण्याचे कारण म्हणजे २०२० मध्ये, भारत सरकारने देशांतर्गत कंपन्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि शस्त्रास्त्र उत्पादनात आत्मनिर्भरता वाढवण्यासाठी शंभरहून अधिक प्रकारच्या लष्करी उपकरणांच्या आयातीवर टप्प्याटप्प्याने बंदी घालण्याची घोषणा केली.
शीर्ष पाच मध्ये अमेरिकन कंपन्या
जगातील शीर्ष पाच शस्त्रास्त्र उत्पादक कंपन्यांमध्ये यूएस-आधारित कंपन्या आहेत. ज्यात लॉकहीड मार्टिन, रेथिऑन टेक्नॉलॉजीज, बोइंग, नॉर्थरोप ग्रुमन आणि जनरल डायनॅमिक्स या कंपन्यांचा समावेश आहे.
यात आश्चर्यकारक गोष्ट अशी की, शस्त्रास्त्रांच्या निर्मितीमध्ये रशिया दुसऱ्या क्रमांकावर असेल अशी अपेक्षा आपण व्यक्त करत असाल. पण, यात चीनने बाजी मारली आहे. शस्त्रास्त्रांच्या विक्रीतील 13 टक्के वाटा घेऊन चीनी शस्त्रास्त्र कंपन्यांचा 2020 मध्ये एकत्रित शस्त्रास्त्र विक्रीचा दुसरा-सर्वोच्च वाटा होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा