पुणे, ३१ डिसेंबर २०२०: “गुगल मॅप” आधुनिक काळातील इंटरनेटचं असं माध्यम जिथं कुठंही जायचं आसलं की लगेच ठिकाणाचं नाव टाईप करतो आणि सहज पोहचतो. आपल्या कुठल्याही ठिकाणाचं उत्तर गुगल कडं हामखास आसतं. पण, तुम्हाला माहीत आहे का की, गुगल मॅपवर अनेक ठिकाणं दाखवण्याची बंदी आहे. आज आपण गुगल मॅपवर आश्याच ठिकाणाबद्दल जाणून घेणार आहोत.
आपलं राहतं घर न सोडताही तुम्ही गुगल मॅपवर जगातील बहुतेक ठिकाणं पाहू शकता. गुगल नकाशा हे एक अर्श्चयकारक टूल आहे. मात्र, या पृथ्वीवर अशीही काही ठिकाणं आहेत. जी तुम्ही गुगल नकाशावर पाहू शकत नाही.
जेनेट बेट (रशिया)
“Jeannette island Russia” असं गुगल मॅपवर टाईप करा. तुम्हाला मॅप व्ह्यू किंवा सॅटॅलाइट व्ह्यू यापैकी दोन्ही दिसणार नाही. उपलब्ध नाही असे सांगणारा “unavailable 76.717947,158.109982.” असा पाॅपअप मेसेज ही येईल.
हेलिपुएर्टो डी कार्टाजेना, लाॅस डोलोरेस (स्पेन)
या परिसराविषयी खूप जास्त माहिती नाही. हा परिसर गुगल स्ट्रीट व्ह्युवर पाहण्याचा प्रयत्न केल्यास, येथील खुप मोठा परिसर रिकामा दिसून येईल.
मोरोरोआ (साऊथ पॅसिफिक)
साऊथ पॅसिफिकमध्ये आढळणारा मोरोरोआ हा फ्रेंच पाॅलिनेशियन बेटाचा एक भाग आहे. या बेटाचा अर्धा भाग स्पष्ट आहे. तर अर्धा भाग अस्पष्ट आहे. फ्रान्सनं या ठिकाणी अण्वस्त्र चाचणी घेतली होती. असं सांगितलं जातं त्यामुळे या ठिकाणा विषयी गुप्तता पाळली जात असंल.
उत्तर कोरिया
संपूर्ण उत्तर कोरिया गुगल मॅपवर ब्लाक आहे. सर्व युजर्संना एरियल किंवा सॅटेलाइट व्ह्यू या देशाला पाहता येईल. यातही शहरांची नावं आणि हिरवेगार डोंगरासारखे तुम्हाला काहीतरी दिसेल. याशिवाय सर्वकाही दिसणार नाही.
वेलन्सिया शहर
फिलीपीन्समध्ये बुकीडनाॅन प्रांतातील वेलन्सिया सिटी हे एक मोठं शहर आहे. मात्र, गुगल मॅपवर संपूर्ण शहर अस्पष्ट दिसतं. याचं कारण आजूनही समोर आलं नाही. मात्र, वेलन्सियातील घरं मुख्य क्षेपणास्त्र कार्यक्रमातील भाग आहे आणि सरकारनं संपूर्ण शहर पिक्सेलेट करण्याचा निर्णय घेतला आहे, अशा आफवा आहे.
द ओव्हल ऑफिस (वाॅशिंग्टन डि सी)
गुगल मॅपवर तुम्हाला व्हाईट हाऊस स्पष्टपणे दिसेल. पण द ओव्हल ऑफिस, जिथं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपलं काम करत आसतात, ते सुरक्षितेचा कारणांमुळं पांढरं रंगाचं दिसून येईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव