प्रतिबंधित क्षेत्रातून या तालुक्यातील ही गावे वगळली

लोणी काळभोर, दि. २० मे २०२०: दि. २० मे रोजी पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, उरुळी कांचन या गावचे प्रतिबंधित क्षेत्र कंटेंटमेंट झोन रद्द करण्यात आले असून येथे गेल्या २८ दिवसात एकही नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली नसल्याने ही गावे यातून रद्द केल्याचे हवेली उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी आज जाहीर केले.

कोरोना विषाणूचा संसर्ग पुणे शहरात झपाट्याने पसरत गेल्यानंतर शहरालगतच्या गावात कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. उरुळी कांचन येथे पूर्व हवेलीतील पहिला रुग्ण सापडला त्यानंतर कदम वस्ती लोणी काळभोर येथे रुग्ण आढळून आले. त्यामुळे ही गावे प्रतिबंधित करण्यात आली. परंतू गेल्या २७ दिवसात एकही रुग्ण आढळून आला नसल्याने उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, यांनी ही गावे यातून रद्द करण्यात आल्याचे घोषित केले आहे.

आज काढलेल्या परिपत्रकात पेरणे, लोणीकंद गावठाण, पिसोळी अतुलेनगर, कोंढवे धावडे, ग्रीन कंट्री सोसायटी, परिसर याचाही समावेश आहे. येथील प्रतिबंधित क्षेत्र हटवल्यानंतर अनेक अटी शिथिल होऊ शकतात अशी आशा स्थानिक नागरिकांना आहे. कारण गेल्या दोन महिन्यापासून पूर्ण लॉकडाऊन असल्यामुळे अनेक एक सेवा देणारी दुकाने पूर्णपणे बंद आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा