पूर्व हवेलीतील थेऊर गाव पूर्णपणे कोरोना मुक्त, थेऊर मध्ये आनंदाचे वातावरण.!

थेऊर, दि. २३ जुलै २०२०: कोरोना विषाणूच्या संसर्गातून थेऊर अखेर कोरोना मुक्त झाले कोरोनाची साखळी संपुष्टात आणण्यात प्रशासनाला यश आले आहे.

येथील सर्वच्या सर्व १४ रुग्ण कोरोना वर मात करून दवाखान्यातून आपल्या घरी परतले आहेत सध्या येथे एकही रुग्ण नसल्याची माहिती कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉक्टर मेहबूब लुकडे यांनी दिली. कोरोनाचा संसर्ग सर्वत्र झपाट्याने वाढत असून पूर्व हवेलीतील गावांमध्ये दररोज नवीन रुग्ण आढळून येत आहेत.

यात लोणी काळभोर, उरुळी कांचन, कदम वाकवस्ती या मोठ्या लोकसंख्येच्या गावात रुग्णांची संख्या मोठी आहे. यामुळे आरोग्य विभागावर मोठा ताण येत असून कोरोना रुग्णांना वेळेवर बेड उपलब्ध होत नाहीत. थेऊर मध्ये सुरुवातीला सहा रुग्ण सापडले. त्यांच्यावर उपचार चालू असताना काही दिवसांनी पुन्हा दोन रुग्ण आढळले. त्यापाठोपाठ पुन्हा रुग्णालये आरोग्य कर्मचारी महसूल विभाग पोलिस प्रशासन व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून योग्य उपाययोजना करूनही संक्रमणाची साखळी तोडण्यात आली.

डॉक्टरांकडे उपकेंद्रातील आरोग्य अधिकारी डॉ. पूजा सूर्यवंशी, आरोग्यसेविका प्रशांत बिराजदार, सेविका भारती सोनवणे, थेऊर मधील आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्या अथक प्रयत्नातून येथील सर्व कोरोना संक्रमित रुग्ण आजारावर मात करून परत आले आहेत. पुढील काळात पुन्हा कोरोना संक्रमण होऊ नये यासाठी आरोग्य कर्मचारी अंगणवाडी सेविका शालेय शिक्षक यांचा चार लोकांचा गट तयार करून प्रत्येक गटाला ७० ते ८० कुटुंबाच्या सर्व्हे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. असे ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब कांबळे यांनी सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा