“मला घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे”, कंगना रणौतच्या घरावर गोळीबार…..

मनाली, २ ऑगस्ट २०२० : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महात्येनंतर बाॅलिवुड चित्रपटसृष्टीतल्या घराणेशाहीचा काळा चेहरा सर्वसमान्यांसमोर आला.हा चेहरा समोर घेऊन येण्यात जर कोणी अग्रणी असेल तर ती अभिनेत्री कंगना रणौत हिचा महत्वाचा हात आहे. बाॅलिवूड मधील घराणेशाहीवर चित्रपट सृष्टीतील कुठल्याच कलाकाराने वक्तव्य करण्यात कधी पुढाकार घेतला नाही. पण कंगनाने निर्भिडपणे आपले स्पष्ट मत मांडत सुशांत सिंग राजपूत हा या घराणेशाहीचा बळी ठरला असे परखड मत मांडले आहे.

याच पार्श्वभूमीवर काल कंगना रणौतच्या मनाली येथील घरावर गोळीबार झाला. या घडलेल्या प्रकारवर कंगनानें “मला घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.जेव्हा गोळीबाराचा आवाज आला तेव्हा मी बेडरुममध्ये होते” असे ती म्हणाली. गोळीबारचा आरोप कंगनाच्या टिमने केला असून पोलिसांत तक्रार देखील करण्यात आली आहे. कंगनाच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

सुशांत सिंग राजपूत आहत्महत्येच्या या पार्श्वभूमीवर कंगना रणौतने आपली मते स्पष्टपणे मांडली आहेत . तिच्या नंतर अनेक कलाकार हे हिंम्मत करुन बाॅलिवूड चित्रपट सृष्टीतील घराणेशाहीवर आता बोलत असून यामुळे बाॅलिवूड चित्रपटसृष्टीचा काळा चेहरा समोर येत आहे तर याचा जास्त प्रमाणात फटका हा करण जोहर,सलमान खान आणि आलिया भट्ट यांना होत असून सोशल मिडियावर यांच्या विरोधात नेटकरी हे अजूनही सडकून टिका करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा