तृतीय पंथांच्या वेशात येऊन जबरदस्तीने घुसले घरात आणि उकळले पैसे

6

जळगाव, २६ सप्टेंबर २०२२: जळगाव शहरातील वाटिकाश्रम परिसरात आमवशा असल्याने भिक्षा मागत फिरणारे तृतीय पंथी एका घरात घुसले. त्या घरात एकटी मुलगी होती. त्याचाच फायदा घेत एक तृतीय पंथी घरात शिरला व दोन जण बाहेर पाळत ठेवण्यासाठी थांबले होते.

आत गेलेल्या एका तृतीय पंथीने मुलीचा गळा दाबून तिला आतल्या रुम मधून पैसे आणायला लावले. मुलीने संधी बघून आरडाओरडा करायला सुरुवात केली. हे लक्षात येताच तिघांनी तेथून पळ काढला. शेजारी राहणारे नागरिक त्यांचा पाठलाग करु लागले होते.

तिघही शेजारच्या कॉलनीत शिरले व एका घरात जबरदस्तीने घुसले, तिथेही एका व्यक्तिला पैसे मागितले. त्यांनी पाकीट हातात काढले असता. तिघांनी त्यांचे पाकीट हीसकावून त्यातून एक हजार रुपये काढून घेतले. हे तिघेही जबरदस्तीने नागरिकांना लुबाडत आहेत. म्हणून नागरिकांनी त्याना बेदम मारहाण केली.

त्यानंतर तिघांनाही पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, यांच्यावर आधीपासूनच गुन्हे दाखल आहेत. नकली तृतीय पंथी बनून हे नागरिकांना लुबडतात असतात. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा