इंदापूर तालुक्यात मुंबईहून आलेले “ते” कुटुंब शासकीय वसतिगृहात क्वारंटाइन

8

इंदापूर, दि.१७ मे २०२०: मुंबई अंधेरी येथून आपल्या मूळ गावी आलेल्या इंदापूर तालुक्यातील शिरसोडीमध्ये एक कुटुंब आले होते. ग्रामपंचायत प्रशासनाने वेळीच खबरदारी घेत त्यांना इंदापूर येथील शासकीय वसतिगृहात क्वारंटाइन करण्यात आले होते.

या गावातील एकाच कुटुंबातील  चार जणांचे स्वब टेस्टिंग करण्यात आले होते. त्यातील दोन जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनाची लागण झालेल्या कुटुंबाचे  दि.१५ रोजी स्वब टेस्टिंग करून ते चाचणी साठी पुण्याला पाठविण्यात आले होते. त्याचा शनिवारी रात्री उशिरा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मात्र एकच खळबळ उडाली होती.

इंदापूर तालुक्यात सध्या बारा हजाराहून अधिक मुंबई, पुणे व इतर ठिकाणाहून नागरिक आलेले आहेत.ग्रामीण भागातील शहरी भागातून येणाऱ्या नागरिकांची अजूनही रीघ चालूच आहे.
या शहरातून आलेल्या नागरिकांनी आपला स्वतःचा जीव धोक्यात घातला आहे. मात्र ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये हे लोक राहण्यासाठी आलेले आहेत. त्यांनी खरी माहिती न देता ते गावात येऊन वावरत आहेत. त्यामुळे आता कोरोणाची संख्या वाढायला वेळ लागणार नाही. यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या दहशतीचे  वातावरण निर्माण झाल्याने नागरिक कमालीचे भयभीत झाले आहेत.

इंदापूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेखा पोळ व डॉ. एकनाथ चंदशिवे यांनी सांगितले की, शुक्रवारी पाठविलेल्या चार जणांच्या स्वब
टेस्टिंग रिपोर्ट आता हाती आले आहेत. त्यापैकी ३५ वर्षे महिला आणि ११ वर्षीय मुलगी असे दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर एका सात वर्षांच्या मुलाचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे. यांच्यावर इंदापूरातील शासकीय विश्रामगृहात उपचार सुरू आहेत.

खबरदारीची उपाय म्हणून आपण हे रुग्ण मुंबईतून इंदापूर तालुक्यात येताच त्यांना इंदापूर शहरातील शासकीय वस्तीगृहात क्वारटाईनकेले होते. ते मुंबईतील ज्या भागातून आले होते. त्या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या असल्याने आम्ही त्यांची स्वब  टेस्टिंग केली नागरिकांनी घाबरून न जाता घरातून बाहेर पडू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.

या मुंबईहून आलेल्या व्यक्तींचा आणखी कोणाशी संबंध आला आहे का ही देखील तपासणी केली जात आहे. इंदापूर तालुक्यात भिगवण स्टेशन वगळता शहराच्या आसपास कोरोणाची लागण झालेले दोन रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता शासनाच्या नियमाचे पालन करून आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
इंदापूर तालुक्यात मुंबईहून आलेले नागरिक यातील दोघांना कोरोणाची लागण झाली आहे . शनिवारी दि.१६ रोजी झालेल्या बैठकीत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बाहेरून येणाऱ्या नागरिकांना सक्तीने शाळेत किंवा विद्यालयात क्वारंटाइन करण्याचे आदेश दिले आहेत.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तहसीलदार सोनाली मेटकरी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा पोळ यांच्यासह सर्व आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा