फलटण तालुक्यातील आसू येथे चोरट्यांनी एकाच रात्रीत तीन घरे फोडली

32

फलटण, सातारा १६ जुलै २०२४ : साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील आसू येथे चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून काल एकाच रात्रीत तीन घरे फोडून, पाच तोळे सोन्याचे दागिने व रोकड अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडलीय.

शरयू साखर कारखान्याचे संचालक अविनाश भापकर आणि जिल्हा बँकेचे कर्मचारी रवींद्र भापकर यांच्या घरी चोरी झालीय. घर गावच्या मुख्य चौकात असून रात्री वरच्या मजल्यावर रवींद्र भापकर हे झोपले असता अज्ञात चोरट्याने बंगल्याच्या खिडकीच्या काचा फोडून आत प्रवेश केला. कटावनीच्या साहाय्याने लोखंडी कपाट उघडून त्यातील पाच तोळे सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली. आणखी दोन घरांपैकी नंदकुमार पवार यांच्या देवघरातील चांदीचे दागिने लंपास करण्यात आल्याची माहिती समोर येतेय. पुढील तपास पोलीस करतायत.

न्यूज अनकट प्रतिनीधी : आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा