कोकणी माणसाची फसगत हे सरकार करणार नाही: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रत्नागिरी,३० नोव्हेंबर २०२३: कोकणाच्या विकासासाठी कॅबिनेट बैठकीची आवश्यकता असेल तर ती सुद्धा घेतली जाईल, परंतु कोकणच्या विकासाला प्राधान्य दिलेले असून ते आपल्या समोर दृश्य स्वरूपात असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रत्नागिरी येथे केले. ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व नमो अकरा सुत्री कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती कुमार पुजार व अन्य मान्यवर उपस्थित होते.
कोकणी माणसाने बाळासाहेबांवर प्रेम केले तसेच शिवसेनेवर देखील प्रेम केले, पण त्या बदल्यात त्यांना काय मिळाले? विकास कामे किंवा असे काही विकासाचे प्रकल्प येतात त्याला विरोध करणे चुकीचे आहे. कोकणच्या लोकांनी मेहनत केली, त्यांनी प्रामाणिकपणे प्रेम केले त्यांची फसगत किंवा विश्वासघात आमचे सरकार करणार नाही, असा शब्द आज मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरी येथे दिला. त्यामुळे कोकणचा विकास जितक्या मार्गाने करता येईल तितक्या विविध मार्गी करणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कोकाकोला कंपनीमुळे कोकणात 2 हजार रोजगार निर्मिती होणार आहे त्यामुळे येथील बेरोजगार मुलांना बाहेर जाण्याची आवश्यकता राहणार नाही. याचबरोबर मुंबई- सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड एक्सप्रेस हायवे देखील येत्या काळात होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच कोकण विकासासाठी एमएमआरडीच्या धरतीवर कोकणासाठी प्राधिकरण देखील स्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


न्यूज अनकट प्रतिनिधी:केतन पिलणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा