नवी दिल्ली, 10 जानेवारी 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो पुढील महिन्यात होणाऱ्या पाच राज्यांच्या लसीकरण प्रमाणपत्रांमध्ये वापरला जाणार नाही. सूत्रांनी रविवारी ही माहिती दिली. निवडणूक आयोगाने शनिवारी यूपी, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. या राज्यांमध्ये तारखा जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झालीय. त्यानुसार हे पाऊल उचलण्यात आलं आहे. निवडणूक आचारसंहिता लागू झाली असून, निवडणूक राज्यांमध्ये ठिकठिकाणी बॅनर, पोस्टर होर्डिंग्ज आदी हटवण्यात येत असल्याचं अधिकृत सूत्रांचं म्हणणं आहे. अशा परिस्थितीत या राज्यांतील लसीकरण प्रमाणपत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं चित्र वापरलं जाणार नाही.
सूत्रांचं म्हणणं आहे की केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने CoWIN प्लॅटफॉर्ममध्ये अशा प्रकारे बदल केले आहेत की, या राज्यांच्या लस प्रमाणपत्रांमध्ये पीएम मोदींचा फोटो वेगळा करता येईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर शनिवारी रात्रीच हे फिल्टर लागू करण्यात आलं. सरकार, उमेदवार आणि राजकीय पक्षांसाठी निवडणूक आचारसंहिता प्रभावी झालीय.
निवडणूक आयोगाने शनिवारी यूपी, पंजाब, मणिपूर, गोवा आणि उत्तराखंड च्या विधानसभा निवडणुका फेब्रुवारी ते मार्च दरम्यान आयोजित करण्याची घोषणा केली. यूपीमध्ये जास्तीत जास्त सात टप्प्यात मतदान होणार आहे. तर मणिपूरमध्ये 14 फेब्रुवारीला एका टप्प्यात आणि इतर दोन राज्यांमध्ये मतदान होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी ही घोषणा केली.
अधिकृत सूत्रांनी सांगितलं की, या पाच राज्यांमध्ये लसीकरणानंतर लोकांना जे प्रमाणपत्र मिळणार आहे, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं चित्र नसेल. यासाठी आवश्यक तांत्रिक बदल यापूर्वीच कोविन प्लॅटफॉर्मवर लागू करण्यात आले आहेत. यापूर्वी, आरोग्य मंत्रालयाने मार्च 2021 मध्ये असाच पुढाकार घेतला होता, जेव्हा आसाम, केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. सर्व राजकीय पक्षांकडून तक्रारी आल्यानंतर निवडणूक आयोगाने यासाठी सरकारकडे विनंती केली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे