मुंबई, दि. २८ जुलै २०२० : राज्यात कोरोनाच्या बाबतीत पहिल्यांदाच असे घडले आहे की, गेल्या २४ तासात जितके रुग्ण वाढले त्या पेक्षा जास्त प्रमाणात रुग्णांना डिर्स्चाज देण्यात आले आहे.
राज्यात गेल्या २४ तासात ७,९२४ नवे कोरोना रुग्ण आढळले असून २२७ जणांचा मुत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासात ८,७०६ रुग्णांना डिर्स्चाज देण्यात आले आहे. तर एकुण २ लाख २१ हजार ९४४ रुग्णांना सोडण्यात आले तर १ लाख ४७ हजार ५९२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.राज्यात एकुण रुग्णसंख्या ३,८३,७२३ इतकी झाली आहे.
कोरोना विषाणुला आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. अशातच कित्येक महिन्यानंतर अशी एक सकारात्मक गोष्ट समोर आली ज्या मधे कोरोनाच्या नविन रुग्ण संख्येच्या जास्त प्रमाणात कोरोना मुक्त रुग्णांना सोडण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्राची सध्याची वाटचाल ही कोरोनामुक्तीकडे जात आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. तरी अजूनही राज्यातील ब-याच भागात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव हा पहायला मिळत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी