अखेरचा हा दंडवत ….

मुंबई, 29 जून 2022: शिवसैनिकांना मी आवाहन करतो, की कोणीही मध्ये येऊ नका. त्यांना मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवरुन काढल्याचा आनंद मिळावा यासाठी मी राजीनामा देत आहे. असे म्हणत अखेर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. तसेच मी माझ्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. त्यामुळे आता मी राजीनामा देऊन पुन्हा शिवसेना भवन वर बसून शिवसैनिकांना भेटणार..

इतिहासात घडलेली गोष्ट..
मंत्रिमंडळात केवळ चार मंत्री होते. मी काम केली. संभाजीनगर, धाराशीव, असं नामांकन करत आता माझं काम केलं. पण याला दृष्ट लागली. मला शरद पवार , कॅांग्रेस नेते , यांचे आभार मानायचे. पण बाकीचे माझ्याबरोबर आहे, की कोणाबरोबर आहे, हे तुम्हाला माहित आहे. मी कायम मनापासून बोलतो, हे तुम्हाला माहित आहे. माणसं मोठी झाली. ज्यांना जे जे देतां येईल ते दिलं. ज्यांना दिलं ते नाराज, ज्यांना नाही दिलं, ते हिंमतीने बरोबर आहेत. ही आहे शिवसेना. आपण आपली बाजू मांडली आहे. पण आता अखेर मी राजीनामा देत आहे आणि आता नवीन लोकशाहीचं स्वागत करुया. पण बाहेर गेलेल्या लोकांना आम्ही बाहेरुन पाठिंबा देऊ, पण तुम्ही परत या.. आता मी राजीनामा देत आहेत. तसेत विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहेत।

आपला कृपाभिलाषी
मुख्यमंत्री उद्घव ठाकरे…

न्यूज अनकट प्रतिनिधी -तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा