यामुळं 26 जानेवारी रोजी साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

पुणे, 26 जानेवारी 2022: प्रजासत्ताक दिन 2022 इतिहास, महत्त्व: भारत यावर्षी आपला 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. यावेळी प्रजासत्ताक दिनाचा उत्सव काही दिवसांपूर्वीच सुरू झाला होता. 1947 मध्येच देशाला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं, मात्र तीन वर्षांनी 26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधान लागू झालं. त्यामुळं दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. डॉ. भीमराव आंबेडकर संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तथापि, 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान सभेने भारतीय राज्यघटना स्वीकारली म्हणून देशात दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो.

दरवर्षीप्रमाणं यंदाही प्रजासत्ताक दिनाची जय्यत तयारी करण्यात आलीय. देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. 26 जानेवारीच्या दिवसाचं मुख्य आकर्षण म्हणजे परेड, जी दिल्लीच्या राजपथपासून सुरू होते आणि इंडिया गेटपर्यंत जाते. या वर्षी, परेडमध्ये विविध राज्ये, विभाग आणि सशस्त्र दलांच्या 16 लष्करी तुकड्या, 17 लष्करी बँड आणि 25 टॅबल्सचा समावेश आहे. या दिवशी राष्ट्रपती राजपथावर ध्वजारोहण करतात.

या कार्यक्रमात भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दलानं भारताच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वारशाचं प्रदर्शन केलं आहे. यासोबतच राजपथावर वेगवेगळ्या राज्यांचे टॅबलेक्स येतात, जे त्यांच्या राज्यांची संस्कृती दर्शवतात. यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाची राजधानी दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आलीय. दिल्ली मेट्रोची पार्किंग सेवा निलंबित करण्यात आलीय, तर अनेक स्थानकांवर काही तासांसाठी एक्झिट-एंट्री बंद राहतील.

प्रजासत्ताक दिनाचा इतिहास

प्रजासत्ताक दिनाच्या इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर, 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली. संविधान सभेचं, ज्याचा उद्देश भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करणे हा होता, त्याचं पहिलं अधिवेशन 9 डिसेंबर 1946 रोजी भरलं. शेवटचं अधिवेशन 26 नोव्हेंबर 1949 रोजी संपलं आणि त्यानंतर एक वर्षानंतर संविधान स्वीकारलं गेलं.

प्रजासत्ताक दिन 2022 चं महत्त्व

प्रजासत्ताक दिन हा स्वतंत्र भारताच्या आत्म्याचं प्रतीक आहे. 1930 मध्ये या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं पूर्ण स्वराज घोषित केलं. हा दिवस भारतीय जनतेला लोकशाही पद्धतीनं त्यांचं सरकार निवडण्याच्या शक्तीची आठवण करून देतो. हा दिवस देशात राष्ट्रीय सुट्टी देखील आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा