या महिन्यात साजरा होतोय ३ रा राष्ट्रीय पोषण माह

नवी दिल्ली, ७ सप्टेंबर २०२० : लहान मुले आणि महिलांमधील कुपोषणाकडे लक्ष वेधण्यासाठी या महिन्यात ३ रा राष्ट्रीय पोषण माह साजरा केला जात आहे. प्रत्येकाचे आरोग्य आणि पोषण सुनिश्चित करण्यासाठी जन भागीदारीला प्रोत्साहित करणे हे या पोषण माहचे उद्दीष्ट आहे. महिला व बाल विकास मंत्रालयाने सांगितले की हा पोषण अभियान दरवर्षी साजरा केला जातो, जो २०१८ मध्ये सुरू करण्यात आला होता.

सध्याची देशातील कोविड परिस्थिती लक्षात घेता मंत्रालयाने सर्व भागधारकांना पोषण माह उत्सव साजरा करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. गेल्या महिन्याच्या ३० तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अापल्या रेडिओवरील ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या ६८ व्या आवृत्तीत पौष्टिकतेचे महत्त्वावर भर दिला होता.

मुलांना व विद्यार्थ्यांना त्यांची अधिकतम क्षमता प्राप्त करण्यासाठी पोषण आहार देण्याच्या भूमिकेकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. त्यांनी गेल्या काही वर्षांत केलेल्या प्रयत्नांचीही नोंद घेतली, विशेषत: ज्या खेड्यांमध्ये पोषण सप्ताह आणि पोषण महिन्यात लोकसहभागाने पोषण जागरूकता मोठ्या प्रमाणात बदलली आहे

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा