सोशल मीडियावर वायरल होतीय वसंत मोरेंची ही पोस्ट

कात्रज, 16 जून 2022: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची विश्वसू सहकारी आणि पुण्याचे माजी मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे पुन्हा एकदा चर्चेत आले असून यावेळेस ते फेसबुकवरील एका पोष्टमुळं चर्चेत आले आहेत. फेसबुकवरुन पुण्यात एका महीलेसोबत घडलेला प्रसंग शेअर करत वसंत मोरेंनी थोडं तरी शहाणं व्हा असा सल्ला नागरिकांना दिलाय.

वसंत मोरेंनी पुण्यामधील पीएमपीएलच्या चालक वाहकाने कशाप्रकारे एका महिलेला मदत केली यासंदर्भातील प्रसंग फोटोसहीत आपल्या फेसबुक पोष्टमधुन सांगितलाय. वसंत मोरे लिहितात, वेळ रात्री पावणे बाराची, टिकाण कात्रज कोंढवा राजस चौक. मी काल नेहमी प्रमाणं चौकातील भटक्या कुत्र्यांना खायला घालायला गेलो तर एक पीएमपीएलची बस पूर्ण लाईट लावून उभी होती आणि गाडीचा कंडक्टर गाडीभवती फिरत होता. डायव्हर त्याच्या डायव्हर सीटवर बसून होता. थोडा संशय आला म्हणून कंडक्टरला विचारलं, काय प्रकार आहे. चालक आणि वाहकाकडं चौकशी केल्यानंतर ते बोलले की, आम्ही सासवडवरून आलोत, गाडीत एक महिला आहे तिच्याकडं छोटं बाळ आहे. त्या इकडंच बाजूला राहातात. निघतान सागिंतलं होतं की त्यांना राजस चौकात त्यांचा दीर घ्यायला येईल.

पण, 15 मिनिटं झाली कोणच येत नाही आणि फोन लागत नाही. आम्हाला गाडी सोडता येईना आणि त्याना पण आता रिक्षा ही मिळत नाही, अशी आपली अडचण. त्यांचा दीर नाही आला म्हणून काय झालं मीच त्यांचा दीर झालो. त्या ताईला गाडीत घेतल आणि सुखरुप घरी पोहोचवलं. घरच्या दारात पोचवलं म्हणून फोटो ही काढला पण खरे धन्यवाद त्या एमएच 12 आर एन 6059 बसचा चालक व वाहक त्यांनी इतक्या रात्री त्या ताईला एकटी उतरू दिले नाही. त्या दोघाची नावे नागनाथ नवरे आणि अरुण दसवडकर.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा