पुणे ६ मार्च २०२२ : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा हा विकासाचा एक टप्पा मानावा लागेल. पुणे महानगर पालिकेपासून हा दौरा सुरु झाला. महानगर पालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करुन पंतप्रधान मोदींनी विकास कार्याची सुरुवात केली. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यादी पंतप्रधान मोदींचे शाही फेटा घालून स्वागत करण्यात आले. मोदींनी सर्वांना अभिवादन करुन ते गरवारे महाविद्यालयाच्या आवारात पोहोचले. आगामी निवडणूकीच्या धर्तीवर हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.
त्यानंतर त्यांनी गरवारे कॅाजेलमधून त्यांनी मेट्रोचं पहिले तिकीट काढलं त्यानंतर पाच किलोमीटरचा प्रवास मोदींनी पार केला. त्यानंतर त्यांनी मेट्रोमधून दिव्यांग मुलांशी चर्चा केली. या मेट्रोमध्ये त्यांनी दिव्यांगाच्या समस्यांबाबत चर्चा केली. या मेट्रोमध्ये दिव्यांगासाठी विशेष डब्याची सोय केली. त्यांनतर एमआयटी महाविद्यालयाच्या प्रांगणात मोदींची सभा झाली. यावेळी त्यांनी महापालिकेच्या अनेक योजनांचे उद्घाटन केले. व्यंग चित्रकार आर.के.लक्ष्मण यांच्या पुस्तकाचे उद्घाटन केले. यावेळी पालकमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनोगत व्यक्त केले. मेट्रो पूर्ण व्हायला १२ वर्षे लागली. यासाठी पूणेकरांना त्रास सहन करायला लागल्याचं अजित पवारांनी नमूद केलं. विकासकामासाठी राजकारण नको असंही नमूद करायला अजित पवार विसरले नाही.
यावेळी मुळा-मिठी नदी शुद्धीकरण आणि सुशोभिकरण प्रकल्पाची उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रीय नदी संवर्धन प्रकल्पाने पुण्याची शोभा वाढणार असून प्रदूषण कमी होणार आहे.
त्याचबरोबर पंतप्रधानांनी पिंपरी ते फुगेवाडी या मार्गाचे उद्घाटन केले. तर इलेक्ट्रॉनिक्स बसेस प्रकल्पाचे उद्घाटन करुन विकासाच्या दिशेने पुढचे पाऊल टाकले.
पंतप्रधान मोदींनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली. त्यांनी एकविसाव्या शतकात शहरासाठीच आधुनिक करण्याचे आणि जास्तीत जास्त लोकांनी मेट्रोचा वापर करण्याचे आवाहन केले. ई बसेस , ई वाहनाचा वापर करण्याचे आवाहन केले. प्रदुषणमुक्तीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मेट्रोमुळे पुणेकरांचे राहणीमान उंचावेल हे सांगायलाच ते विसरले नाही. यावेळी व्यासपीठावर भगतसिंह कोश्यारी , रामदास आठवले, प्रकाश जावडेकर, मुरलीधर मोहोळ, अजित पवार, देवेंद्र फडणवीस आदि नेते उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस