पुणे, ४ सप्टेंबर २०२०: सध्या पुणे शहर हे कोरोनाचं हॉटस्पॉट बनलं आहे. मुंबईला मागे टाकत पुणे आता देशातील सर्वात प्रभावित शहर बनलं आहे. वाढता प्रादुर्भाव पाहता पुण्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी काल नवीन आदेश काढले आहेत. यानुसार पुण्यात नवीन प्रतिबंधित क्षेत्रांची यादी जाहीर केली गेली आहे. महापालिकेतर्फे आणखी आठ नवीन प्रतिबंधित क्षेत्र वाढविण्यात आले आहेत. आता एकूण ७४ प्रतिबंधित क्षेत्र असतील.
नवीन प्रतिबंधित क्षेत्र:
कसबा, विश्रामबाग वाडा- पर्वती जीपीएस ३ फा.प्लॉट नं. ५१२पै., ५१३पै.. ५१३ अ पै., महात्मा फुले वसाहत व लक्ष्मीनगर परिसर
ढोले पाटील रोड- घोरपडी स.नं.५० पै. यलो ब्लॉसम सोसायटी, बी.टी.कवडे रस्ता, घोरपडी स.नं. ४७पै. जाधव वस्ती बी.जी.शिर्के
धनकवडी सहकारनगर- आंबेगाव बुद्रुक, स.नं.४६ टेल्को कॉलनी, लेन नं.१७, कात्रज, संतोषनगर, संपूर्ण संतोषीमाता परिसर, लेन नं.१ ते ७, कात्रज गावठाण परिसर पैकी मनपा शाळेमागील भाग, आंबेगाव बुद्रुक. स.नं. १६, धनकवडी स.नं. १३ पै.,१४ पै. संभाजी नगर, पंचवटी सोसायटी, धनकवडी स.नं. ३ पै., ७, ८ पै. तळजाई पठार
बिबवेवाडी- बिबवेवाडी स.नं.६४५ पै. ६४६ पै., ६४७ पै., ६६६ पै.,अप्पर इंदिरानगर, टीपीएस ३ फा.प्लॉट नं.४११, ४१२ पै. मुकुंद नगर परिसर, टीपीएस ३ फा.प्लॉट नं.५८८ पै, ६१२ ते ६१५.गंगाधाम चौकाजवळ बिबवेवाडी गंगाधाम, वर्धमानपुरा इशा एमराल्ड इ. सोसायटी परिसर
वानवडी रामटेकडी- वानवडी स.नं.६१,६२,६३,६५ पै., केदारीनगर परिसर
शिवाजीनगर घोले रोड- औंध स.नं. २५ पै.,स.नं. ५९ पै. कस्तुरबा वसाहत, औंध स.नं. ७८पै., ७९पै, पै., ८०पै. इंदिरा वसाहत
नगर रोड वडगाव शेरी- खराडी स.नं.६४ पै.,गेरा ट्रीनीटी व गेरा स्काई सोसायटी परिसर, वडगावशेरी स.नं. ७ पै., ८ पै., ब्रम्हा सनसिटी सोसायटी परिसर
सिंहगड रोड- शायरी स.नं. ८अ पै.,६६ पै.,६७ पै. सिंहगड रस्त्याच्या दक्षिणेकडील भाग आणि शायरी रस्त्याच्या पूर्वेकडील भाग आणि कै.नवले शाळा- न-हे रस्त्याच्या उत्तरेकडील भाग धायरी फाटा परिसर | सिंहगड रस्ता व धायरी रस्त्यावरील दुकाने वगळून, हिंगणे खुर्द स.नं. २४ पै. विश्रांतीनगर येथील निवासी वस्ती
हडपसर मुंडवा- हडपसर काळेपडळ स.नं.३६,३७,३८अ ,४९ब मधील परिसर, हडपसर ससाणेनगर, स.नं. ७७, ७९ पै. ८०पै, ३११ मधील परिसर
कोंढवा येवलेवाडी- कोंढवा बुद्रुक स.नं. ३१ पै. भरतपुर चैतन्य मेंटल हेल्थ केअर सेंटर खड़ी मशीन चौक
वारजे कर्वेनगर- कर्वेनगर हिंगणे बुद्रुक स.नं. १९ पै.५३ पै.,श्रमिक वस्ती ,वडार वस्ती, हिंगणे होम कॉलनी परिसर, शिवणे स.नं. १४ मधील परिसर, उत्तमनगर शिवणे स.नं. १५, १६ मधील परिसर
औंध, बाणेर- बोपोडी, तेली चाळ,अनुपम नगरी जुना मुंबई पुणे रस्ता, बोपोडी स.नं. १५ पै.कुंदन कुशल नगर एलफिस्टन रोड, स.नं. २० पै. पाषाण सोमेश्वरवाडी संध्यानगर, औंध गावठाण परिसर, बोपोडी आंबेडकर नगर वसाहत भाऊ पाटील रोड, बोपोडी स. नं. २६ झोपडपट्टी, बोपोडी औंध रोड चिखलवाडी, पाषाण सुतारवाडी स.नं.११२
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे