यंदाची महापूजा स्थानिक वारकरी कुटुंबाच्या हस्ते करावी: पडळकर

मुंबई, दि. २४ जून २०२० : गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर खोचक टीका केली होती. ते असे म्हणाले होते की शरद पवार हे महाराष्ट्रासाठी कोरोना आहेत. यानंतर त्यांनी पुन्हा एक नवीन विधान केले आहे. पडळकर म्हणाले आहेत की यंदाची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते न करता स्थानिक वारकरी कुटुंबाच्या हस्ते करण्यात यावी.

पंढरपूर मधील महापूजेचा मान हा मुख्यमंत्र्यांना असतो यावर बोलताना पडळकर म्हणाले की, “यंदाची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते न करता स्थानिक वारकरी कुटुंबाच्या हस्ते करण्यात यावी. मंत्रीमहोदयांनी या पूजेचा मान एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या वारकरी शेतकऱ्यांना द्यावा असं मला वाटतं. याच्यावरती माननीय मुख्यमंत्री साहेबांनी योग्य विचार करावा.”

देवेंद्र फडणवीस यांनादेखील महापूजेसाठी विरोध करण्यात आला होता याचा संदर्भ देत ते म्हणाले की, पाठीमागे देवेंद्र फडणवीस साहेबांना पंढरपुर इथल्या आंदोलकांनी विरोध केला होता. तेव्हा त्यांनी वर्षा बंगल्यावरच पूजन केलं होतं. विठूरायाचं तशाच पद्धतीचे पूजन त्यांनी मुंबईमध्ये करावे. यमध्यामतून एक चांगला संदेश राज्यामध्ये जाईल.

यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, ” मुख्यमंत्री पदावर बसलेली व्यक्ति ही एक जबाबदार व्यक्ति असते व त्या व्यक्तिला आपली जबाबदारी माहित असते त्यामुळे मला असे वाटते की कोणी यावे किंवा नाही हा त्याने निर्णय घायावा , त्यांना येण्याची इच्छा असेल तर त्यांनी अवश्य यावे. सदर परिस्थितीचा त्यांनी आढावा घ्यावा व त्यानंतर आपला निर्णय ठरवावा की महापूजेला येणे योग्य आहे की नाही. परंतु त्यांना येण्यासाठी विरोध करणे हे माझ्या दृष्टीने योग्य नाही.”

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा