स्टॉकहोम, ६ ऑक्टोंबर २०२०: यंदाचे वैद्यकीय नोबेल पुरस्कार हेपेटायटीस सी विषाणूचा शोध लावणाऱ्या तीन शास्त्रज्ञांना देण्यात आलाय. अमेरिकन शास्त्रज्ञ हार्वे जे. आल्टर, चार्ल्स एम. राईस आणि ब्रिटनचे मायकेल ह्यूटन यांना सन २०२० चा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हेपेटायटीस सी विषाणूच्या शोधासाठी तिन्ही वैज्ञानिकांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. नोबेल समितीचे प्रमुख थॉमस पर्लमन यांनी स्टॉकहोममध्ये याची घोषणा केली.
जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे की जगात ७० दशलक्ष हेपेटायटीसची प्रकरणं आहेत आणि दरवर्षी या आजारामुळं ४ दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. या रोगास तीव्र आजार म्हणून वर्गीकृत केलं जातं आणि यकृत रोग आणि कर्करोगाचं हे मुख्य कारण आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार मानल्या जाणार्या नोबेल प्राइजमध्ये १० स्वीडिश क्रॉनर आणि एक गोल्ड मेडल दिलं जातं. यूएस डॉलरमध्ये ही रक्कम ११,१८,००० आहे. हा पुरस्कार १२४ वर्षांपूर्वी या पुरस्कारासाठी एक निधी तयार केला गेला होता. हा निधी स्वीडनच्या शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबल यांनी तयार केला होता आणि त्यांच्या स्मरणार्थ या निधीतून हा पुरस्कार जगाच्या महत्त्वाच्या शोधासाठी देण्यात येतो.
यावर्षी कोरोना संसर्गामुळं वैद्यकीय क्षेत्रात देण्यात आलेल्या नोबेल पुरस्काराला विशेष महत्त्व आहे. कोरोना संसर्गामुळं जगातील वैद्यकीय क्षेत्रात संशोधनाचं महत्त्व अधोरेखित झालं आहे. नोबेल पारितोषिक ६ क्षेत्रात दिले जाते. दरवर्षी १२ ऑक्टोबरपर्यंत याची घोषणा केली जाते. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, शांती आणि अर्थशास्त्र ही क्षेत्रे आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे