मुंबई ५ जुलै २०२१ : यंदाच्या पावसाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली. ओबीसी आरक्षण, शेतकरी विमा, एमपीएसी अशा अनेक मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहे. सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला अनेक प्रश्नांवरुन घेरलं.त्यातले प्रमुख मुद्दे म्हणजे अधिवेशनाची कार्यक्रमाची पत्रिका आदल्या रात्री दहा वाजेपर्यंत का तयार नव्हती ? असा सवाल त्यांनी खडा केला. सरकार पुढे चालले की मागे? विधेयक आजच मांडून पास करणं, हा कुठला कायदा असा जळजळीत सवाल त्यांनी सरकारपुढे मांडला. सरकारचा मनमानी कारभार सुरु आहे.
लोकशाहीला कुलूप लावले आहे. सरकारच्या मनात नक्की काय आहे, तेच कळत नाही. आमच्या नव्हे तर जनतेच्या प्रश्नांची उत्तरं द्या. असा कारभार करणे योग्य नाही. ओबीसी आरक्षणाचा औपचारिक डाटा मागितला. तोही ते देऊ शकत नाही. तर हे आरक्षण मिळणार कसं? अशा मुद्दयांवर विरोधक आक्रमक झाले. त्यामुळे हे पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस