धाराशीवमधील ज्योती क्रांती बॅकेच्या दरोड्यातील ३ आरोपी गजाआड, बँकेचा माजी कर्मचारीच निघाला मास्टर मांईड

धाराशिव ४ जानेवारी २०२४ : मोबाईलमुळे जगातील घडामोडी कळतात, नवनविन तंत्रज्ञान समजते शिवाय मोबाईलमुळे लांबचा माणुस जवळ येतो. मोबाईलचे अनेक फायदे आहेत तसेच मोबाईलचे अनेक तोटे सुध्दा आहेत. केवळ गुन्हयाच्या ठिकाणी मोबाईल वापरल्यामुळे अट्टल दरोडेखोर पोलीसांच्या गळाला लागले आहेत. धाराशिव शहरातील ज्योती क्रांती बँक दरोडा हा धाराशिव पोलीसांना आव्हान होते. दरोडेखोराच्या चुकीमुळे आज ३ दरोडेखोर कोठडीत आहेत.

या बाबत अधिक माहिती अशी की.दि.२३.१२.२०२३ रोजी सायंकाळी ०५:३८ वाजण्याच्या सुमारास धाराशिव शहरातील सुनिल प्लाझा येथील ज्योती क्रांती कोऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी शाखे मध्ये ५ अनोळखी दरोडेखोरांनी बँकेतील मँनेजर व कँशिअरला बंदूक आणि चाकुचा धाक दाखवुन बँकेतील ४ किलो १२६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम १ लाख ४०००० रुपये, दोन मोबाईल असा एकुण १ कोटी ८७ लाख १४ हजार रुपये किंमतीचा माल घेवुन केवळ ५ मिनिटात लुटून पसार झाले होते. एक प्रकारे दरोडेखोरांनी पोलीसांना आव्हानच दिले होते.

सतीष अनिरुध्द फुटाणे, वय ३७ वर्षे, व्यवसाय- कॅशीअर ज्योती क्रांती कोऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी शाखा धाराशिव, रा. पळसप ता. जि. धाराशिव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पोलीस ठाणे येथे गुरनं ४२६/२०२३ कलम ३९५ भारतीय दंड विधान संहिता अन्वये गुन्हा नोंदवला आला होता. तपासा दरम्यान पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांचे ९ पथके स्थापन केले होते.

बँकेचा माजी सोने तपासणीस सोनारच निघाला मास्टर मांईड……
रमेश बळीराम दिक्षीत हा पुर्वी सदर बँकेत सोने तपासणीस सोनार कर्मचारी होता. दरोडयातील आरोपी आणि या कर्मचाऱ्याचे फोनवर वारंवार संपर्क होता. गुन्हा घडला त्या दिवशी दरोडयातील दरोडेखोरांनी मोबाईलवर संभाषण केले होते. गुन्हयाच्या ठिकाणी चालु असणारे फोनचे सिडीआर तपासले असता परराज्यातील व्यक्तीने शहरातील व्यक्ती बरोबर मोबाईलवर संपर्क केल्याचे निष्पन्न झाले. रमेश बळीराम दिक्षीत याचा मोबाईल तपासले असता संशय खरा ठरला आणि आरोपीला ताब्यात घेतले. आरोपी तुळजापुरच्या दिशेने रिक्षाने गेले होते. त्या मार्गावरील CCTV फुटेज पोलीसांना गुन्हयाची उकल करण्यास फायदयाचे ठरले.

घटनास्थळावरील व इतर ठिकाणचे CCTV फुटेज व सिडी आरचे  तांत्रिक विश्लेषणात्मक परिक्षण करुन आरोपी रमेश बळीराम दिक्षीत, रा. विजय चौक धाराशिव ता. जि. धाराशिव, उदयन वेलाउदयन वल्लीकालाईल, रा.नेरुळ नवी मुंबई, प्रशांत जालीदंर शिंदे, रा.नेरुळ नवी मुंबई यानी त्यांचे अन्य इतर साथीदारासह सदरचा गुन्हा केलेला असल्याचे सागिंतले. सदर आरोपींना नमुद गुन्ह्याच्या तपास कामी अटक करण्यात आली असुन यातील वर आरोपी क्र १ रमेश बळीराम दिक्षीत, रा.विजय चौक धाराशिव ता.जि.धाराशिव यांच्याकडुन १००७ ग्रॅम (१ किलो ७ ग्रॅम) सोन्याचे दागिने ज्याची किंमत ५० लाख ३५ हजार तीनशे रुपयाचे सोने जप्त करण्यात आलेला आहे. गुन्ह्यातील अटक आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची ६ दिवस पोलीस कोठडी मंजुर केलेली आहे. पोलीस कोठडी दरम्यान त्यांचेकडे तपास करुन गुन्ह्यातील इतर आरोपी व उर्वरीत सोने याचा शोध घेण्यासाठी तपास चालू आहे. हा दरोडा ७ दरोडेखोरांनी टाकला होता त्या पैकी तिघांना पकडण्यात पोलीसांना यश आले असुन उर्वरित ४ दरोडेखोर फरार असुन पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

सदरची कामगीरी धाराशिव पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सुदर्शन कासार, शैलेश पवार, सचिन पंडीत, खरड, पोलीस उप निरीक्षक संदीप ओहोळ, पोहेकॉ- अश्विन जाधव, दिलीप जगदाळे, अमोल निंबाळकर, प्रकाश औताडे, जावेद काझी, वल्ली उल्ला काझी, हुसेन सय्यद, शौकत पठाण, पाडुरंग सावंत, विनोद जानराव, समाधान वाघमारे, अशोक ढगारे, फरहान पठाण, नितीन जाधवर, बबन जाधवर, योगेश कोळी, साईनाथ आशमोड, रविद्र आरसेवाड, अमोल चव्हाण, चालक घुगे, चौरे, भोसले, गुरव, आरब, मपोहेकॉ शैला टेळे, शोभा बांगर, रंजना होळकर, तसेच सायबर सेलचे पोलीस अंमलदार- अशोक कदम, सुनिल मोरे यांच्या पथकाने केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : रहिम शेख

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा