बीडमध्ये व्हाट्सअप ग्रुप ॲडमिनसह तिघांना अटक

बीड, दि.२९एप्रिल २०२०: सोशल मीडियावरून अफवा पसरविल्याप्रकरणी व्हाट्सअप ग्रुप ॲडमिनसह तिघांविरुद्ध पेठ बीड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आहे. त्यानुसार तिघांनाही अटक करण्यात आली आहे.

पेठ बीड पोलीस ठाण्यामध्ये दि.२८रोजी पो.ना.राहुल गुरखुदे यांच्या फिर्यादीवरून फेसबुकवरून जाणीवपूर्वक मिडिया आणि प्रशासन यांच्याविरोधात द्वेषभाव व तेढ निर्माण करण्याच्या समीर सरकार या फेसबुक अकाऊंटवरून पोस्ट केल्याप्रकरणी शेख समीर शेख सत्तार (२४, रा.बीड ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली.

याबाबत फिर्यादीने सांगितले की, समीर सरकार याचे फेसबुक अकाऊंटवरून सदरील पोस्ट सय्यद खय्युम सय्यद जमीर याने M. Khan नावाच्या व्हाट्सएप ग्रुपवर पोस्ट केली आहे. त्यामुळे ही पोस्ट करणारा त्या ग्रुपचा अडमिन सलीम जावेद शेरखान ( ३०, रा.बीड ) याने ही पोस्ट करण्यास ग्रुप अडमिन म्हणून संमती दिलेली आहे. म्हणून दोघांनाही या गुन्ह्यात आरोपी करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
त्यांच्याकडून दोन मोबाईलही जप्त करण्यात आले असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक के.बी.भारती हे करीत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा