उस्मानाबाद जिल्ह्यात आढळलले अजून तीन कोरोना रूग्ण

उस्मानाबाद, दि.१८ मे २०२० : उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे. कोरोना बाधीत असलेले अजून ३ रूग्ण काल आढळून आले.

उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब तालुक्यातील पाथर्डी येथील पती – पत्नी आणि कळंबचा एक महसूल कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर कळंब हावरगावच्या २५ ते ३० वयोगटातील दोन महिलांचे रिपोर्ट पॉजिटीव्ह आल्याने कळंब तालुक्यातील कोरोना रुग्णाची संख्या सहा झाली आहे. तसेच परंडा तालुक्यातील सरणगाव येथील एक टेम्पो चालक कोरोना बाधित होता. आता भूमच्या एका ३४ वर्षाच्या पुरुषाचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. आज पॉजिटीव्ह आलेले तिन्ही रुग्ण मुंबईहुन गावी आले होते. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना बाधीत रूग्णांची संख्या आता ७ झालेली असून कळंब तालुका कोरोना हॉटस्पॉट झाला आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून आजतागायत एकुण ७९९ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी उस्मानाबाद तालुक्यातील १६८, तुळजापूर १४५, उमरगा २०६, लोहारा ५२, कळंब १४५, वाशी ११, भूम १९, परंडा ५३ अशा व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ७४८ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून २८ व्यक्तीचा अहवाल (Rejected) आला आहे. तसेच १७ व्यक्तींचे अहवाल हे अप्राप्त आहेत. तसेच परंडा १, कळंब ३व उमरगा २, येथील व्यक्तींचे अहवाल पॉजिटीव्ह आलेले आहेत. लोहारा तालुक्यातील १ अहवाल मुंबई येथे तपासणी करण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत ७ रुग्णांपैकी उमरगा व लोहारा येथील ३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत व २ रुग्ण उपजिल्हा रुग्णालय कळंब येथे उपचार घेत आहेत तसचे १ रुग्ण परंडा येथील उपजिल्हा रुग्णालायामध्ये उपचार घेत आहेत. कळंब येथील १ रुग्णांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्याला जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून दि १५ मे रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर येथे पुढील उपचारसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.

न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा