हासीमारा, २२ जुलै २०२१: भारताच्या हवाई दलाला बळकटी देण्यासाठी बुधवारी आणखी तीन राफेल लढाऊ विमान भारतीय भूमीवर दाखल झाले आहेत. राफेल विमानाची ही सातवी तुकडी आहे. हे तीन राफेल फ्रान्सहून उड्डाण करत न थांबता सुमारे आठ हजार किलोमीटर अंतर कापून भारतात पोहोचले. भारतीय लष्कराच्या राफेल विमानाच्या दुसर्या पथकात या लढाऊ विमानांचा समावेश असेल.
ही खेप आल्यानंतर आता भारताकडे २४ राफेल विमान आहेत. राफेल विमानांचे नवीन पथक पश्चिम बंगालमधील हसीमारा हवाई तळावर तैनात असेल. अंबाला एअरफोर्स स्टेशनवर पाहिले राफेल पथक उपस्थित आहे. स्क्वॉड्रॉनमध्ये १८ विमाने आहेत. दुसरे पथक जुलैच्या अखेरीस ऑपरेशन सुरू करेल. अंबाला येथे तैनात असलेल्या पहिल्या राफेल पथकाने पूर्व लडाखमध्ये चीनच्या सीमेवर गस्त घालण्यास सुरवात केली आहे.
युएईने इंधन दिले
फ्रान्सच्या या विमानांना हवाईमार्गाच्या मध्यभागी युएईच्या हवाई दलाने इंधन दिले होते. भारतीय हवाई दलाने ट्विट केले की, ‘थोड्या वेळापूर्वी फ्रान्समधील इसरेस एअर बेस येथून उड्डाण करणारे तीन नॉन-स्टॉप राफेल विमान भारतात आले. भारतीय हवाई दलाला मदत दिल्याबद्दल यूएईच्या हवाई दलाचे आभार मानले.
हसीमारा एअर बेसवर राफेल स्क्वाड्रनची तैनाती करणे भारतासाठी मोठी बाब ठरणार आहे, कारण चीनची एअरफील्ड भारतीय विमानाच्या जवळपास येत आहेत. २०१६ मध्ये भारताने फ्रान्सबरोबर ३६ राफेल विमान खरेदी करण्यासाठी करार केला होता. हा करार ५९ हजार कोटी रुपयांवर झाला. येत्या १५-२० वर्षात भारत ११४ मल्टीरोल फाइटर एअरक्राफ्टची ऑर्डर देण्याची तयारी करत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे