इंटरनेट मिनी लोन मुळे एका महिन्यात तीन जणांनी केली आत्महत्या

तेलंगाना, २० डिसेंबर २०२०: कोविड -१९ च्या काळात बर्‍याच तरुणांनी नोकर्‍या गमावल्या, त्वरित कर्जे देण्यासाठी अनेक अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोअरवर होते. कोविड कालावधीनंतर ते पुन्हा नोकरी करतील आणि पैसे परत देतील असा विचार त्या तरुणांना वाटला पण तसे झाले नाही. ज्यांनी असे लोन घेतले ते हे पैसे परत करण्यात असमर्थ राहिल्याने कर्ज देणाऱ्या कंपनीने त्यांना डिफॉल्टर म्हणून जाहीर केले. यानंतर कंपनीने अशा कर्ज बुडवलेल्या ग्राहकांची वैयक्तिक माहिती सार्वजनिक करण्यास सुरुवात केली. यामुळे डिप्रेशन मध्ये येऊन फक्त तेलंगाना मध्येच तीन जणांनी आत्महत्या केली आहे.

आत्महत्या करणाऱ्यां मध्ये मेडक जिल्ह्यात राहणारे एड्डु श्रवण यादव, वय २३, सि‍द्द‍िपेट येथील किरणि मोनि‍का वय २८ आणि रंगारेड्डी जिल्ह्यातील पी सुनील वय २९ यांचा समावेश आहे. किरणि मोनि‍का यांनी स्नॅप इट आणि पी सुनील यांनी बर्‍याच लोन अ‍ॅप्समधून कर्ज घेतले होते.

खरं तर, १६ डिसेंबर रोजी किस्मतपूर येथे राहणाऱ्या २९ वर्षीय सॉफ्टवेयर अभियंता पी सुनीलने घरात फाशी घेऊन आत्महत्या केली. सुनील हैदराबादच्या माधापूर येथे एका खासगी कंपनीत नोकरी करत होते पण, कोविड -१९ काळात त्यांनी नोकरी गमावली.

लॉकडाऊनमध्ये त्यांना इतर कोणतीही नोकरी मिळाली नाही आणि जेव्हा दररोजच्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी कर्ज वाढू लागले तेव्हा ते मोबाईल फोनवर त्वरित कर्ज देणाऱ्या अ‍ॅप्सच्या चपळ्यात आले. त्याने अनेक कर्जाच्या अ‍ॅप्सवरून दोन लाख रुपये घेतले परंतु नोकरी नसल्यामुळे त्यांना हप्ता व भारी व्याज भरता आले नाही आणि पैसे देण्यास अपयशी ठरले.

त्यानंतर या कर्ज कंपन्यांनी आपले खरे रंग दर्शविणे सुरू केले आणि त्यानंतर मोबाइल डेटा आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मदतीने या कंपन्यांनी सुनीलला ब्लॅकमेल करणे सुरू केले आणि पत्नी आणि वडिलांना कॉल करण्यास सुरवात केली.

यानंतर सुनील भयंकर प्रस्त झाला आणि आपल्या फ्लॅटमध्ये १६ डिसेंबर रोजी फाशी घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर सुनीलच्या पत्नीने आयपीसी कलम ४२०, ३०६, ५०४, ५०६ आणि आय ए टी कलम ६७ अन्वये कर्ज देणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल केला.

यात सुरवातीच्या चौकशीत असे निदर्शनास आले की, सुनीलने अनेक मिनी फायनान्स ॲप मधून कर्ज घेतले होते. तपासादरम्यान इन कॅश, कॅश एरा, कॅश लॉयन, लकी वॉलेट, कोको कॅश, रुपी पुस, इंडियन लोन, क्रेडिट फ्र‍िंच, टॅप क्रेडिट, राथेन लोन, कॅश पोर्ट, स्‍माइल लोन, क्रेडिट डे, कॅश टुडे, लकी रुपी, गो कॅश, स्‍नॅपिट लोन, लोन झोन, क्‍व‍िक कॅश, पंडा रुपीस, प्‍ले कॅश, धानी, लेजी पे, लोन टॅप, आईपीपीबी मोबाइल, माइक्रेडिट, क्‍व‍िक क्रेडिट, कॅशऑन, रुपीस प्‍लस, रुपी नाउ, एलिफेंट लोन, एंट कॅश, क्‍व‍िक मनी यांसारख्या अॅप’मधून कर्ज घेण्यात आल्याचे समजले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा