गोल पोस्ट राष्ट्रीय जमावाकडून तीन साधूंना जबरदस्त मारहाण; मुलाच्या चोरीची आफवा

जमावाकडून तीन साधूंना जबरदस्त मारहाण; मुलाच्या चोरीची आफवा

रायपूर, ७ ऑक्टोबर २०२२: छतीसगडच्या दुर्गमध्ये तीन साधूंना मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संपूर्ण प्रकरण असे आहे. हे प्रकरण दूर्गमधील भिलाई-३ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. मुल चोरीच्या संशयावरुन गावातील लोकांनी तीन साधूंना बेदम मारहाण केली आहे.

काही कारणास्तव तीन साधू रस्ता चुकले होते आणि ते दूर्गमधील भिलाई-३ च्या चारोडा वस्तीमध्ये पोहोचले असता स्थानिक लोकांनी त्यांना थांबवून चौकशी सुरु केली. मात्र त्यांचे काहीही न ऐकता लोकांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत तीन्ही साधू रक्तबंबाळ झाले.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि चौकशी सुरु केली असता मुलं चोरीच्या संशयावरुन गावातील लोकांनी तीन साधूंना मारहाण केली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात लोकांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, सर्व साधूंना किरकोळ जखमा झाल्या असून रुग्णालयात उपचार घेउन त्यांना सोडण्यात आले आहे. सोबतच नागरिकांनी अफवांवर विश्र्वास ठेऊ नका आणि कायदा हातात घेऊ नये असं आव्हान दूर्ग पोलिसांनी केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version