चेंबर साफ करताना तीन सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू, पुण्यातील वाघोली येथील घटना

पुणे, २१ ऑक्टोबर २०२२ : पुण्यामध्ये आज (२१ ऑक्टोबर) सकाळी एक दुर्दैवी घटना घडली.वाघोली येथील एका सोसायटी मध्ये ड्रेनेजच्या चेंबरची सफाई करताना तीन सफाई कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाला. पुण्यातील वाघोली येथील सोसायटीत सकाळी सहाच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

पीएमआरडीए च्या बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून तिघांचेही मृतदेह बाहेर काढन्यात आले आहेत. नितीन प्रभार गोंड, वय ४५, गणेश भालेराव, वय २८ फकीर बाबा वस्ती नांदेड, सतीशकुमार चुडाहरी वाघोळी डोमखेल, वय ३५ अशी मृत्युमुखी पडलेल्या सफाई कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

आज सकाळी चेंबरची सफाई करायला गेल्यानंतर, चेंबर मध्ये असलेल्या विषारी वायूमुळे ते बेशुद्ध पडले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तिघांनाही बाहेर काढले परंतु तिघांचाही मृत्यू झाला होता.

न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा