पश्चिम बंगाल, ८ जुलै २०२३: पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झालीय. मात्र, मतदानावेळी काही ठिकाणी हिंसाचार झाला. यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या तीन कार्यकत्यांची हत्या झाली आहे. राज्यात पंचायत निवडणुक काळात झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे.
कूचबिहारमध्ये आज सकाळी एका मतदान केंद्रांची तोडफोड आणि मतपत्रिका जाळण्याची घटना समोर आली. दरम्यान आपल्या पक्षाच्या तीन कार्यकत्यांची रेजीनगर, तुफनगंज आणि खारग्राममध्ये हत्या झाली असून डोमकोलमध्ये झालेल्या गोळीबारात दोनजण जखमी झाले आहेत, असा दावा तृणमूल काँग्रेसने केला आहे.
निवडणूका शांततेत पार पाडण्यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मात्र सर्वत्र कडेकोट बंदोबस्तानतरही काही भागात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार २२ जिल्ह्यातील ६३२२९ ग्रामपंचायत, ९७३० पंचायत समिती आणि जिल्हापरिषदेच्या ९२८ जागांसाठी मतदानास प्रारंभ झाला आहे. येथे ५.६७ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीचा निकाल ११ जुलै रोजी जाहीर होणार आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर