२० सप्टेंबरपासून टिकटॉक आणि वीचॅटवर अमेरिकेत बंदी…

वॉशिंग्टन, १९ सप्टेंबर २०२०: राष्ट्रीय सुरक्षा कारणास्तव अमेरिका टिकटॉक आणि वीचॅटवर बंदी घालत आहे. वाणिज्य विभाग रविवार, म्हणजेच २० सप्टेंबरपासून या दोन्ही अॅप्स डाऊनलोड करण्यास बंदी घालू शकेल. अमेरिकेचे वाणिज्यमंत्री विलबर रॉस म्हणाले की, सुरक्षा कारणास्तव हे केलं जात आहे, कारण या अ‍ॅप्सच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांचा वैयक्तिक डेटा चोरीला जातोय. अमेरिकेच्या वाणिज्य विभागानंही शुक्रवारी त्यासंदर्भात एक आदेश जारी केलाय.

यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वीचॅट आणि व्हिडिओ अॅप टिक-टॉकवर बंदी आणण्याविषयी बोलले आहेत. ट्रम्प यांचा असा आरोप आहे की अशा अॅपमुळं राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर अमेरिका आणि चीनमध्ये चर्चा वाढली आहे.

त्याचवेळी टिकटॉक’नं अशी टीका केली की ट्रम्प यांनी पुन्हा निवडणूक जिंकण्यासाठी चीनविरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी हे केलं होतं. टिक्टॉक’नं सांगितलं, “३ नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प पुन्हा निवडून येण्यासाठी चीनविरोधी मोहीम राबवणं याचाच एक भाग आहे.”

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी ६ ऑगस्ट रोजी टिकटॉकवर बंदी घालण्याच्या कार्यकारी आदेशात म्हटलं आहे की ९० दिवसांत टिकटॉक’नं एकतर अमेरिकेतून आपला व्यवसाय बंद करावा किंवा आपला व्यवसाय एखाद्या अमेरिकन कंपनीला विकावा.

फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले की, आपल्या देशाची अर्थव्यवस्था चीनपासून वेगळी करण्याच्या शक्यतेवर चर्चा होत आहे. केवळ अमेरिकाच चीनच्या वस्तू विकत घेतो असं नाही तर चीन देखील अमेरिकन वस्तूंचा मुख्य खरेदीदार आहे.

ट्रम्प यांनी टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, अमेरिकेबरोबर चीनमधील व्यावसायिक व्यवहार योग्य नाहीत, म्हणून आम्ही देशाची अर्थव्यवस्था त्यापासून पूर्णपणे वेगळा करण्याचा प्रयत्न करू.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा