टायगर अभी जिंदा है – खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

फलटण १६ एप्रिल २०२३ – फलटण शहर व तालुक्याला हिंदू मुस्लिम ऐक्याची मोठी परंपरा असून या परंपरेला कोणी तोडण्याचा प्रयत्न केल्यास आपण रखवाला म्हणून उभा राहणारा आहोत कोण काय बोलते काय करते याकडे कोणी लक्ष देऊ नये टायगर अभी जिंदा है अशी ग्वाही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

फलटण शहरातील मलटण भागात असणाऱ्या मलटन मस्जिदमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते यावेळी मलटन मस्जिद दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष जावेदभाई शेख, हाजी कादरभाई पठान, हाजी सिकंदरभाई बागवान ,रज्जाकभाई बागवान ,ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, प्रल्हादराव साळुंखे पाटील, जयकुमार शिंदे, ॲड नरसिंह निकम, विश्वासराव भोसले माजी नगरसेवक अशोकराव जाधव,अमोल सस्ते तसेच हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माझे वडील हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्यावर मुस्लिम समाजाने खूप प्रेम केले त्यांनी कधीही जात-पात मानली नाही तोच वारसा आम्ही चालवत आहोत,
मलठण मशिदीला माझे वडील हिंदुराव नाईक निंबाळकर मस्जिद म्हणून नाव दिल्याबद्दल मी मुस्लिम समाजाचा आभारी असून इफ्तार पार्टी चे निमित्ताने हिंदू आणि मुस्लिम समाज मोठ्या संख्येने आल्याबद्दल खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी समाधान व्यक्त केले.

फलटण शहर व तालुक्याने कधीही जातीपातीला थारा दिलेला नाही येथील भाईचारा पूर्ण देशात अभिमानस्पद आहे त्यामुळे येथे सर्व समाज एकोपाने राहत असताना त्यामध्ये कोणी अडथळा आणत असेल तर आपण रखवाला म्हणून उभा राहणार आहोत काही मुस्लिम बांधव गणेश मंडळाचे अध्यक्ष आहेत तर मशिदचे रखवाला म्हणून हिंदू बांधव उभे असतील टायगर अभी जिंदा है हे तेड निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींनी लक्षात घ्यावे असे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले, यावर्षी शिवजयंती आणि रमजान ईद एकाच दिवशी येत असून आपण सर्वांनी एकत्र मिळून शिवजयंती आणि ईद जोरदार साजरी करावी आणि देशात एकतेचा चांगला संदेश द्यावा असे आवाहन खा रणजितसिंह यांनी केले

यावेळी मलटन मशिदीचे नामकरण
माजी खा हिंदुराव नाईक निंबाळकर मस्जिद दर्गा ट्रस्ट मलटन असे खा रणजितसिंह यांच्या हस्ते सन्मानपूर्वक करण्यात आले

न्यूज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा