पुणे, ९ ऑगस्ट २०२२:महाराष्ट्र आणि कर्नाटकात हिंदू आणि मुस्लीम समुदायातील लोक मोहरमच्या काळात त्यांच्या नवसाचा भाग म्हणून वाघाच्या पट्ट्यांसह स्वतःला रंगवतात. मोहरम च्या काळात साजरा केला जाणारा हा एक सांस्कृतिक प्रथेचा भाग आहे.
इस्लामिक कॅलेंडरच्या पहिल्या महिन्यात मोहरम या सणाच्या दरम्यान,विशेषतः दक्षिण पश्चिम भारतातील पेंटिंग कलाकार ‘वाघ’ रुपी मनुष्य रंगवण्यात व्यस्त असतात. एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण शरीर रंगविण्यासाठी सुमारे २० ते ३० मिनिटे लागतात. रचनेवर कोणतेही बंधन नसले तरी, बॉडी पेंटिंगचे स्वरूप शेवटी प्रत्येक कलाकाराच्या कौशल्यावर अवलंबून असते.
अरब देशांमध्ये वाघ आढळत नाहीत आणि त्यांचा इस्लामी संस्कृती किंवा इतिहासाशी थेट संबंध नाही असे जाणकारांचे मत आहे. मोहरमचा १० वा दिवस प्रेषित मुहम्मद यांचे नातू इमाम हुसेन इब्न अली यांच्या करबलाच्या(आता इराकमध्ये) लढाईतील हौतात्म्याचे प्रतीक आहे आणि जगभरातील शिया मुस्लिम हा शोक मनवण्याचा चा काळ म्हणून पाळतात, उपवास करतात आणि प्रार्थना करतात.
न्यूज अनकट प्रतिनिधी: गुरू पोरे