नवी दिल्ली, २५ जून २०२० : १६ वर्षीय टिकटॉक स्टार सिया कक्कर हि एक यशस्वी टिकटॉक स्टार होती. टिकटॉकवर सियाचे जवळपास १.१ दशलक्ष फॉलोअर्स होते. त्याचवेळी, तीचे व्हिडिओ इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅटवरही चांगले पसंत केले जात होते. तीच्या डान्स व्हिडिओंना हजारो लाईक्स होते.
संपूर्ण प्रकरण काय आहे?
एका खाजगी वृत्तवाहिनीच्या संपादकांच्या म्हणण्यानुसार सियाने आत्महत्या केली असून तीच्या मृत्यूची पुष्टी तीचे व्यवस्थापक अर्जुन सरीन यांनी केली आहे.
अर्जुनच्या मते, सियाच्या आत्महत्येचे कारण वैयक्तिक असावे असे वाटते . कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर ती चांगली कामगिरी करत होती. काल रात्री मी तीच्याशी एका प्रकल्पाबद्दल बोललो. ती सामान्य आवाजात बोलत होती. सिया ही एक हुशार प्रतिभावान मुलगी होती ‘.
१६ वर्षांची स्वीट तिकिटवॉलकर सिया हिचा मृत्यू आत्महत्येतून झाला हे खुप दुःखद आहे.तीने हा मार्ग का निवडला यात काय चूक झाली हे तीच्या व्यवस्थापकालाही माहिती नाही. आपण तीचे व्हिडिओ पहा तर आपल्याला कळेल की तीचे व्हिडिओ किती चांगली आहेत. तीने हा आत्महत्येचा मार्ग निवडला हे फार वाईट आहे. आपण जर निराश होत असल्यास कृपया हे असले कृत्य करू नका ‘.
सिया दिल्लीच्या प्रीत विहारमध्ये राहत होती. लोकांना तिचे डान्स व्हिडिओ खुप आवडत असायचे . यूट्यूबवरही तीचे व्हिडिओ लोकांमध्ये बरेचसे लोकप्रिय आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी












































