पुणे : टिकटॉकवर व्हिडीओ तयार करणे पीएमपी बस चालकाला महागात पडले आहे. या बस चालकाला आपली नोकरी गमवावी लागली आहे.
पीएमपीएमएलच्या बस चालकाने टिकटॉकवर केलेला व्हिडीओ कामावर असताना केला. हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला. बस डेपोमध्ये त्याने हा व्हिडीओ तयार केला होता. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने याची दखल घेतली.
बस चालकावर प्रशासनाने निलंबन आणि चौकशीची कारवाई केली. त्यानंतर त्याला बडतर्फही केले आहे.
प्रशासकीय शिस्तीच्या दृष्टिकोनातून हे गंभीर आहे. यामुळे महामंडळाची प्रतिमा लोकांमध्ये मलिन होत आहे.
या प्रकरणी सर्व चालक-वाहक आणि खाजगी बसवरील सेवकांना बसमधील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल न करण्याची नोटीस बजावली आहे.
त्याचबरोबर प्रवाशांना देखील बसमधील व्हिडीओ करण्यास प्रतिबंध करण्याची सूचना करण्यात आली आहे, अशा आशयाचे एक परिपत्रक काढण्यात आले आहे.