९ मे पर्यंत देशभरात २८३ श्रमिक विशेष गाड्या धावल्या

नवी दिल्ली, दि. १० मे २०२०: लॉकडाऊनमुळे देशाच्या विविध भागात अडकलेले स्थलांतरित मजूर, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर व्यक्तींना विशेष रेल्वेने मूळ गावी परतता येईल याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर रेल्वेने श्रमिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला.

९ मे २०२० पर्यंत देशाच्या विविध राज्यातून २८३ श्रमिक विशेष गाड्या चालवण्यात आल्या, यापैकी २२५ गाड्या आपल्या नियोजित स्थानी पोहोचल्या तर ५८ गाड्या अद्याप वाटेवर आहेत. काल म्हणजे शनिवारसाठी ४९ श्रमिक विशेष गाड्या नियोजित होत्या.

या २८३ गाड्यांपैकी, आंध्रप्रदेश (२ गाड्या), बिहार (९० गाड्या), हिमाचल प्रदेश (१ गाडी), झारखंड (१६ गाड्या), मध्य प्रदेश (२१ गाड्या), महाराष्ट्र (३ गाड्या), ओदिशा (३ गाड्या), राजस्थान (४ गाड्या), तेलंगणा (२ गाड्या), उत्तरप्रदेश (१२१ गाड्या), पश्चिम बंगाल (२ गाड्या) अशाप्रकारे राज्यात त्यांचा प्रवास समाप्त झाला.

या गाड्यांनी प्रयागराज, छप्रा, बलिया, गया, पूर्णिया, वाराणसी, दरभंगा, गोरखपूर, लखनौ, जौनपुर, हतिया, बस्ती, कथिहार, दानापूर, मुझफ्फरपूर, सहारसा इत्यादी ठिकाणी प्रवाश्यांना पोहोचवले आहे.

सोशल डीस्टन्सिंगचे पालन करत जास्तीत जास्त सुमारे १२०० प्रवासी या श्रमिक विशेष गाडीतून प्रवास करू शकतात. गाडी सुरु होण्यापूर्वी प्रवाश्यांची तपासणी सुनिश्चित करण्यात येते. प्रवासादरम्यान प्रवाश्यांना मोफत भोजन आणि पाणी पुरविले जाते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा