कालपर्यंत २०,२९,४२४ लाभार्थ्यांना लसीकरण

नवी दिल्ली, २७ जानेवारी २०२१: काल प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीही देशभरात लसीकरण मोहीम सुरू होती. देशभरात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात काल अकराव्य दिवशी लसीकरण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन य दोन लस भारतात वापरल्या जात आहेत. यातील कोव्हॅक्सीन भारतीय बनावटीची आहे. तर दुसरी लस भारतात उत्पादित केली गेली आहे. दोन्हीही लस प्रभावीरीत्या काम करताना दिसत आहेत.

देशभरात प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाच्या निमित्ताने काल मर्यादित राज्यांमध्ये मर्यादित संख्येने लसीकरण सत्रे घेण्यात आली. त्यानुसार, आज संध्याकाळी ७ वाजेपर्यंतच्या पाच राज्यात ५,६१५ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. या राज्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आंध्र प्रदेश (९), कर्नाटक (४९२), राजस्थान (२१६), तामिळनाडू (४,९२६) आणि तेलंगणा (३५). काल सायंकाळी सात वाजेपर्यंत १९४ सत्रे घेण्यात आली.

देशभरात लसीकरण करण्यात आलेल्या एकूण आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांची संख्या २०.२९ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. अहवालानुसार ३६,५७२ सत्रांत एकूण २०,२९,४२४ (काल संध्याकाळी ७ वाजेपर्यंत) लाभार्थ्यांचे लसीकरण झाले. लसीकरण मोहिमेच्या अकराव्या दिवशी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ६ एईएफआयची (लसीकरणानंतर झालेला थोडा त्रास) नोंद झाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा