मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना थिल्लरबाजी शोभत नाही- देवेंद्र फडणवीस

माढा, १९ ऑक्टोबर २०२०: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस हे आज माढा तालुक्यातील टाकळी व गारअकुले, चांदज याठिकाणी अतिवृष्टीने भीमानदीला आलेल्या महापुरात बाधित झालेल्या गावांचा दौरा करण्यासाठी आले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात आमचे जीएसटीचे पैसे केंद्राने अडवले आहेत आम्हाला केंद्राच्या मदतीची गरज नाही आमचे पैसे द्यावे.

त्यामुळे आमचा निधी दिला तर आम्ही योग्य वेळी योग्य ती पूरग्रस्तांना मदत करू आमचे जीएसटीचे पैसे अडवले त्यामुळे निधीची कमतरता भासत आहे. असे देवेंद्र फडणीस यांना विचारले असता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सांगितले की उद्धव ठाकरेंना ही थिल्लरबाजी शोभत नाही. या सरकारने काहीही झाले की टोलवाटोलवी केली आहे. आता खऱ्या अर्थाने मदतीची गरज असताना केंद्राकडे बोट दाखवून रिकामे झाले ही टोलवाटोलवी चालू केली आहे. तुमच्यात दम नाही का आम्ही आमच्या वेळी केंद्राच्या मदतीची वाट आम्ही बघितली नाही, आम्ही दहा हजार कोटींची तरतूद केली होती. हिमतीने काम करावे लागते कधी केंद्राकडे बोट दाखवत बसले तर कधी ह्याच्याकडे कधी त्याच्याकडे.

या सरकारला एक लाख 20 हजार कोटी कर्ज काढण्याची मुभा दिली आहे. का नाही कर्ज काढत? आतापर्यंत सरकारने 50 हजार कोटी कर्ज काढले असून 70 हजार कोटी कर्ज काढण्याचे बाकी आहे.

मदत काय देणार ते सांगा पळवाटा शोधू नका

यावेळी माढा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आमदार प्रशांत परिचारक, आमदार राम सातपुते, सोलापूरचे खासदार सिध्दारामेश्वर स्वामी, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, प्रविण दरेकर, राजेंद्र राऊत, गोपीचंद पडळकर, लक्ष्मण ढोबळे, माढा तालुका भाजपा अधक्ष योगेश बोबडे, अमर शेंडे, जयसिंग ढवळे, राजाभाऊ पाटील, उमेश पाटील, योगेश पाटील, बबन केचे, तात्या बिचकुले, निवृत्ती तांबवे, रामचंद्र टकले, भारत माने, यावेळी विविध गावचे सरपंच, सोसायटीचे चेअरमन, भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा