पोर्तुगालमध्ये भारतीय महिलेच्या मृत्यूमुळे आरोग्यमंत्र्यांवर राजीनामा देण्याची वेळ

मुंबई, १ सप्टेंबर २०२२: एका भारतीय गर्भवती महिलेच्या मृत्यूवरून पोर्तुगालमध्ये खळबळ उडाली आहे.पोर्तुगालची राजधानी लिस्बन येथे भारतीय वंशाच्या एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. यानंतर पोर्तुगालच्या आरोग्यमंत्री मार्ता टेमिडो यांनी राजीनामा दिला आहे. या महिलेला मॅटर्निटी वॉर्डमध्ये दाखल करण्यात येणार होते. मात्र, तिला पोर्तुगालच्या सर्वात मोठ्या रूग्णालयात जागा मिळाली नाही. दरम्यान, दुसऱ्या एका रूग्णालयात घेऊन जाण्याआधीच या महिलेचा मृत्यू झाला.

काय आहे प्रकरण?

एक भारतीय गर्भवती महिला पोर्तुगालला फिरायला गेली होती. त्यावेळी ही महिला प्रसूतीसाठी पोर्तुगलच्या एका मोठ्या रूग्णलयात गेली. मात्र, रुग्णालयातील प्रसूती वॉर्डमध्ये तिला जागा नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तिला दुसऱ्या रूग्णलयात नेत असताना या महिलेला हृदयविकाराचा झटका आला यानंतर या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेने निधनापूर्वी एका गोडस मुलाला जन्म दिला.

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, गर्भवती पर्यटकाला लिस्बनच्या सांता मारिया हॉस्पिटलमधून स्थानांतरित केले जात होते. देशातील सर्वात मोठे हॉस्पिटल मध्ये प्रसूती युनिटमध्ये रिकामे बेड नव्हते. मॅटर्निटी वॉर्डमध्ये कर्मचाऱ्यांच्या कमतरतेबद्दल पोर्तुगीज सरकारवरही बरीच टीका होत आहे.
अलीकडच्या काही महिन्यांत पोर्तुगालमधून अशा अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीही महिलेला रुग्णालयात नेत असताना दोन मुलांचा मृत्यू झाला होता. पोर्तुगालसमोर डॉक्टरांची मोठी समस्या उभी राहिली असून, त्यासाठी परदेशातून डॉक्टरांची भरती करण्याची योजना आखली जात आहे. काही ठिकाणी प्रसूती वॉर्ड बंद असल्याने रुग्णालयांमध्ये गर्दी होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा