महावितरणच्या निविद्या उघडण्यास विलंबामुळे अभियंत्यांवर उपासमारीची वेळ

बारामती, १४ ऑक्टोबर २०२०: बारामती विभागाअंतर्गत एम्प्लॉयमेंट प्रिव्हेंटिव्ह आणि ब्रेकडाऊन, डिटीसी, एच टी, एल टी, देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी तसेच पॉवर ट्रान्सफॉर्मर वाहतूक करण्यासाठी दि.३१ जुलै रोजी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. या निविदा प्रसिद्ध करण्यामागचा मूळ उद्देश म्हणजे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना या निविदा भरता याव्यात यासाठी त्यांचा अनुभव ग्राह्य धरला जाणार होता.

या निविदेनुसार अभियंता ठेकेदारांना ३ वर्षांकरिता कामं मिळाली असती. परंतु निविदा कालावधी ३१ जुलै ते १४ ऑगस्ट होती. प्रसिद्ध जाहिरात त्यानुसार निविदा १७ ऑगस्ट रोजी उघडणार होत्या किंवा काही तांत्रिक अडचण आल्यास दुसऱ्या दिवशी उघडणार होते. पण आता जवळपास दोन महिने उलटून गेले तरी बारामती महावितरण विभागाच्या प्राध्यापक निविदा उघडण्यात आल्या नाहीत.

याबाबत काही ठेकेदारांनी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता आता सोमेश्वर उपविभाग हा बारामती विभागात मध्ये जोडला गेला आहे. त्यामुळे निविदा उघडण्यात विलंब होत आहे असे सांगण्यात येते. मात्र निविदा कधी उघडणार निश्चितपणे सांगता येत नसल्याने अभियंता व ठेकेदारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

कोरोनाने रोजगारावर गदा आणली आहे. अशातच महावितरण बारामती विभागाने अभियंता ठेकेदारांची परीक्षा बघत असल्याचे सुशिक्षित बेरोजगार अभियंता ठेकेदारांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी याच निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या.

या निविदेमध्ये संबंधित सुशिक्षित बेरोजगार ठेकेदाराला तीन वर्षाचा अनुभव असणे बंधनकारक होते, तसे नसल्यास त्याला यांनी विदेव मधून बाहेर काढले जाईल असा नियम होता. परंतु हाच नियम सर्व ठेकेदारांना लावून होता संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यात काही आर्थिक देवाण घेवाण झाली असल्याचे नाव छापण्याच्या अटीवर सांगितले. इतर विभागात मात्र दोन वर्षे अनुभव असलेले लोक समाविष्ट झाले आहेत. परंतु बारामती विभागातच वेगळे नियम लावले जात असल्याचे अभियंता बोलत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा