लॉकडाऊनमुळे छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ; शासनाने मदत करावी

जालना, दि.३ जून २०२०: कोरोना संसर्गजन्य आजारामुळे गेल्या २२ मार्चपासून संपूर्ण देश आणि महाराष्ट्र राज्यात पूर्णपणे लॉकडाऊन आहे. त्यामुळे अजूनही बरेचसे व्यवसाय बंदच आहेत.

गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून लहान- सहान व्यावसायिकांचे व्यवहार बंद असल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामळे आशा छोट्या व्यावसायिकांना शासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते विलास खरात यांनी केली आहे.

या संदर्भात अँड खरात यांनी म्हटले आहे की, कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन घोषीत केल्यामुळे गेल्या २२ मार्च पासून लहान- सहान व्यावसायिकांचे व्यवसाय पूर्णपणे बंद आहेत. यात सायकल, हातगाड्यासह लहान मोठ्या टपर्‍या टाकून काही जण कापड व्यवसाय करतात, काही इलेक्ट्रीकल, न्हावी, सिलाई मशिन, मंडप डेकोरेशन, मंगल कार्यालय चालक, फर्निचर दुकानदार, मोबाईल शॉपी चालक, इस्त्री, चहा टपरी- हॉटेल, पाणी विक्रेते, पान टपरी चालक, रसवंती,ज्युस सेंटर, आयस्क्रीम सेंटरवाले, कुंभार समाज, बांबुवाले, भांडे दुकानदार, चांभार व्यवसाय करणारे, चप्पल- बुट दुकानदार, गॅरेज चालक, ब्युटी पार्लर, घरगुती व्यवसाय करणार्‍या महिला आणि मजूर हा वर्ग कोणाकडे भीक मागू शकत नाही की त्यांना बँकाही उभे करत नाहीत म्हणूनच अशा या वर्गावर खरोखरच उपासमारीची वेळ आलेली आहे.

ही बाब गंभीर असून महाराष्ट्र सरकारने देखील याचा सहानुभूतीपूर्वक विचार करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. या सर्व मंडळींचा उदरनिर्वाह आपापल्या व्यवसायांवरच अवलंबून आहे. गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून त्यांचे व्यवसाय बंद आहेत. हे नुकसान भरुन निघणारे नसले तरी अशा व्यवसायिकांना आर्थिक मदत करणे हे शासन म्हणून आपले आद्य कर्तव्य असून ते तातडीने पार पाडावे, अशी विनंतीही अँड. खरात यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा