शाळा बंद असल्याने विद्यार्थी वाहतुकदारांवर उपासमारीची वेळ

पुणे, २७ सप्टेंबर २०२०: बारामती तालुक्यातील लॉकडाऊनमुळे सर्व शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थी वाहतूक करणा-या वाहतूकदारांवर उपासमारीची वेळ आली असून शाळा बंद असेपर्यंत सर्व करात शंभर टक्के सूट मिळावी यासह अन्य मागण्याबाबत दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा बारामती तालुका विद्यार्थी वाहतूक संघाच्या वतीने नानासाहेब गावडे व तानाजी बांदल यांनी दिला आहे.

शाळा बंद असल्याने मार्च महिन्यापासून कोरोनाच्या संकटामुळे सर्व शाळा बंद आहेत. सप्टेंबर महिना संपत आला असून सहा महिने झाले आहेत. तरी शाळा कधी सुरु होणार याची काही शाश्वती नाही. याबाबत बारामती तालुका विद्यार्थी वाहतूक संघाच्या वतीने शनिवार दि. २६ सर्व वाहतूकदारांनी बँकेकडून कर्ज काढून वाहने खरेदी केलेली आहेत. कर्जाचे हप्ते, विमा इतर कर कोठून भरायचे हा प्रश्न वाहतुकदारांसमोर आहे. नर्सरी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा बंद असल्याने वाहतूक देखील बंद आहे.

या संदर्भात दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात वाहतूकदारांनी त्यांच्या मागण्या केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने स्कूल व्हॅन बंद असतील तो पर्यंत सर्व करांमध्ये शासनाने शंभर टक्के सूट द्यावी, शाळा सुरु झाल्यावर विना अट विना दंड गाड्या पासिंग करुन मिळाव्यात, वाहनवरील कर्जाचे हप्ते व्यवसाय सुरु होईपर्यंत स्थगित व्हावे, कोणत्याही प्रकारचे व्याज व दंड न आकारण्याबाबत सर्व बँकांना आदेश द्यावेत, तसेच वाहतूकदाराना आर्थिक मदत करावी यांसह इतर मागण्यांचे निवेदन दिले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा