टाइम मॅगझिनच्या १०० ‘ सर्वात प्रभावशाली लोकांच्या ‘ यादीत मोदी-ममता आणि अदार पूनावाला

पुणे, १६ सप्टेंबर २०२१ : पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा जगात आपले नाव गाजवले आहे. टाइम मॅगझिनने प्रसिद्ध केलेल्या २०२१ च्या १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्थान मिळाले आहे.

पीएम मोदी व्यतिरिक्त, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांचाही टाईमने सर्वाधिक प्रभावशाली लोकांच्या यादीत समावेश केला आहे.

टाइमने बुधवारी ‘२०२१ च्या १०० सर्वात प्रभावशाली लोकांची’ वार्षिक यादी जाहीर केली. नेत्यांच्या या जागतिक यादीमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, उपाध्यक्ष कमला हॅरिस, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, ड्यूक आणि डचेस ऑफ ससेक्स प्रिन्स हॅरी आणि मेघन आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा समावेश आहे.

या यादीत एक नाव तालिबान या दहशतवादी संघटनेचा राजकीय चेहरा मुल्ला अब्दुल गनी बरदार यांचेही आहे. याशिवाय इनोव्हेटर्स’मध्ये एलोन मस्क यांचे नावही समाविष्ट आहे. त्याचबरोबर पुतिनविरोधी कार्यकर्ते अलेक्सी नॅव्हलनी आणि रशियात पकडलेली गायिका ब्रिटनी स्पीयर्स यांना प्रभावी लोकांच्या या यादीत स्थान देण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा